Evening Snack: पावसाळी वातावरणात भजी खावीशी वाटताय? चहासोबत ट्राय करा कुरकुरीत मॅगी पकोडे, रेसिपीही अगदी सोपी

Last Updated:

Evening Snack: पावसाळ्यातील थंड संध्याकाळी गरमागरम चहासोबत कुरकुरीत भजी खाण्याची अनेकांना इच्छा होते.

+
Evening

Evening Snack: पावसाळी वातावरणात भजी खावीशी वाटताय? चहासोबत ट्राय करा कुरकुरीत मॅगी पकोडे, रेसिपीही अगदी सोपी

अमरावती: पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा (भजी) आस्वाद घेण्याची मजा वेगळीच असते. चहाच्या कपाबरोबर आलं-लसणाचा सुगंध असलेले कुरकुरीत पकोडे मिळाले की, संध्याकाळ सुखकर होते. पकोड्यांचे विविध प्रकार केले जातात. सध्या मॅगी पकोडे हा प्रकार सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. झटपट होणारी ही रेसिपी चवीला अतिशय टेस्टी लागते. घरगुती साहित्य वापरून तुम्ही ही रेसिपी अगदी सहज बनवू शकता. मॅगी पासून बनवलेले विविध पदार्थ तर तुम्ही खाऊन बघितले असतीलच, आता मॅगी पकोडे देखील ट्राय करा.
मॅगी पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य : 2 मॅगी पॅकेट, 1 मॅगी मसाला, 1 वाटी डाळीचं पीठ (बेसन), अर्धी वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, ओवा, जिरे, मीठ, हळद, गरम मसाला, तळण्यासाठी तेल इत्यादी.
advertisement
मॅगी पकोडे बनवण्याची कृती : एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मॅगी मसाला व मॅगी टाकून अर्धवट शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर नूडल्स हलक्या हाताने मॅश करून बाजूला ठेवावेत. त्यानंतर त्यात बेसन, रवा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, ओवा, मीठ, हळद, कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे सर्व घटक चांगले एकजीव करून घ्या.
advertisement
यात पाणी टाकण्याची गरज नाही. मॅगीच्या ओलाव्याने मिश्रण व्यवस्थित एकत्र होते. त्यानंतर पकोडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आहे. त्यात हळूहळू तयार मिश्रणाचा एक एक गोळा सोडायचा आहे. सोनेरी रंग येईपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहेत. काही मिनिटांतच अगदी कुरकुरीत पकोडे तयार होतील.
हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम मॅगी पकोडे सर्व्ह करू शकता. याठिकाणी दिलेलं साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याप्रमाणे बनवलेले पकोडे अगदी कुरकुरीत होतात. हिरव्या चटणीसोबत अतिशय टेस्टी लागतात. चहा, कुरकुरीत पकोडे आणि चटणी हा बेत तुम्ही नक्की ठरवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Evening Snack: पावसाळी वातावरणात भजी खावीशी वाटताय? चहासोबत ट्राय करा कुरकुरीत मॅगी पकोडे, रेसिपीही अगदी सोपी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement