'पक्ष आम्हाला सहकार्य करत नाही', ठाकरेंच्या शिलेदारांची ऐन निवडणुकीत माघार; पक्षाला जबर झटका

Last Updated:

पक्षात येणाऱ्या अडथळ्यांमुळे आमच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर माघार घेत असल्याचे म्हटले आहे, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
लातूर :  राज्यात नगरपंचायत आणि नगपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक लढवली जात आहे.एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चढत असताना दुसरीकेडे लातूरमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला निवडणुकीअगोदर मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी पक्षाने सहकार्य न केल्याचा ठपका निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षाच्या येथील 16 पैकी 11 उमेदवारांनी निवडणुकीतून माघारा घेतली आहे.
लातूरमधीस रेणापूर नगरपंचायतीत हा प्रकार घडला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रेणापूर नगरपंचायतीसाठी 16 उमेदवार दिले होते. मात्र आता 16 पैकी 11 उमेदवारांनी अचनाक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या 11 जणांमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारांनी पक्षाकडून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नाही त्यामुळे पक्षात येणाऱ्या अडथळ्यांमुळे आमच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर माघार घेत असल्याचे म्हटले आहे.
advertisement

कोणकोणत्या उमेदवारांनी घेतली माघार?

  1. ललिता बंजारा - नगराध्यक्षपद
  2. अनुसया कोल्हे
  3. महेश व्यवहारे
  4. गोविंद सुरवसे
  5. रेखा शिंदे
  6. रेहानबी कुरेशी
  7. छाया आकनगीरे
  8. राजन हाके
  9. धोंडीराम चव्हाण
  10. शांताबाई चव्हाण
  11. बाबाराव ठावरे

रेणापूर नगरपंचायतीत चौरंगी लढत

महत्त्वाचे म्हणजे ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या सर्वच उमेदवारांना नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले होते. रेणापूर नगरपंचायतीची 2016 मध्ये स्थापना झाली. त्यानंतर 2017 मध्ये येथे निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर 3 वर्षे प्रशासकांचा काळ राहिला. यंदा याठिकाणी भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्र्रवादीच्या शरद पवार गट चौरंगी लढत होणार आहे.
advertisement

काँग्रेसचीच खेळी असल्याची चर्चा 

भाजपला आव्हान देण्यासाठी या 11 उमेदवारांना माघार घेण्यास सांगून शिवसेनेला दुबळे केल्याचा आरोप केला जात आहे. ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही काँग्रेसचीच खेळी असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

लातूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 44 तर सदस्य पदासाठी 614 जण निवडणुकीच्या आखाड्यात 
advertisement
उदगीर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 8 तर सदस्य पदासाठी 205, निलंगा नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी 7 तर सदस्य पदासाठी 88, औसा नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी 8 तर सदस्य पदासाठी 78, अहमदपूर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी 11 तर सदस्य पदासाठी 149 आणि रेणापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी 10 तर सदस्य पदासाठी 94 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पक्ष आम्हाला सहकार्य करत नाही', ठाकरेंच्या शिलेदारांची ऐन निवडणुकीत माघार; पक्षाला जबर झटका
Next Article
advertisement
Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement