वारकरी गुरुकुलात शिकणाऱ्या मुलीवर महाराजाचा वारंवार अत्याचार, चेल्यानेही दिली साथ
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महाराजाने आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.
Crime in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका महाराजाने आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून आरोपी तिचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ही घटना खेड लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलमध्ये घडली. याप्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी कदम प्रितेश प्रभाकर यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी काही काळापासून लोटे येथील गुरुकुलात राहून आध्यात्मिक शिक्षण घेत होती. या काळात गुरुकुल प्रमुख भगवान कोकरे महाराज हे तिच्याशी वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केल आहे. सुरुवातीला तिने हा प्रकार गुरुकुलातील एका सदस्याला सांगितला. मात्र त्याने 'महाराजांची सामाजिक आणि राजकीय ओळख आहे. याबाबत कोणाला काही बोलू नकोस', असे सांगून तिला गप्प केले. मात्र, हे वारंवार घडत राहिल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली.
advertisement
त्यानंतर कुटुंबीयांनी थेट खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी भगवान कोकरे महाराज व प्रितेश कदम यांना ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
view commentsLocation :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
October 16, 2025 10:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वारकरी गुरुकुलात शिकणाऱ्या मुलीवर महाराजाचा वारंवार अत्याचार, चेल्यानेही दिली साथ