advertisement

रत्नागिरीच्या खोल समुद्रात स्फोटाचे आवाज, मध्यरात्री घडलेल्या घटनेचं गूढ समोर, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात शनिवारी रात्री समुद्रात स्फोटा सारखे आवाज ऐकू आले आहेत.

News18
News18
राजेश जाधव, प्रतिनिधी रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात शनिवारी रात्री समुद्रात स्फोटा सारखे आवाज ऐकू आले आहेत. खोल समुद्रातून अशाप्रकारे स्फोटाचे आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. आतमध्ये काही वेगळं काही घडतंय का? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. या घटनेमुळे परिसरात विविध अफवा पसरल्या होत्या. आता अखेर मध्यरात्री घडलेल्या या घटनेचं गूढ समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसराच्या खोल समुद्रात २० नाँटीकल मैल मधून स्फोटासारखे आवाज येत होते. प्रचंड मोठे आवाज असल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं होतं. समुद्रात नेमकं काय घडतंय? याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. आता समुद्रातील स्फोटाच्या आवाजाचे गूढ उकलण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश आलं आहे.
advertisement
खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्याने हे आवाज आले होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे. रात्रीपासून पोलीस यंत्रणेकडून गूढ आवाजासंदर्भात शोध सुरू होता. यानंतर अखेर पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
advertisement
खरं तर, यापूर्वी रत्नागिरीसह विविध समुद्र किनाऱ्यांवर गुन्हेगारी कृत्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा समुद्रामार्गे तस्करी किंवा इतर क्रिमीनल अॅक्टीव्हीटी घडल्या आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे समुद्रातून स्फोटासारखे आवाज आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र ते आवाज सिग्नल पिस्टलचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे समुद्र किनारी भागात राहणाऱ्या लोकांचा जीव भांड्यात पडला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रत्नागिरीच्या खोल समुद्रात स्फोटाचे आवाज, मध्यरात्री घडलेल्या घटनेचं गूढ समोर, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement