advertisement

Crime News : मध्यरात्री अडवलं अन् दगडाने...;नालासोपाऱ्यात जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट

Last Updated:

Nalasopara Crime News : नालासोपाऱ्यात एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. कोणत्या वादातून हा प्रकार घडला आहे ते ऐकून तुम्हीही हादरुन जाल.

News18
News18
नालासोपारा : नालासोपाऱ्यात जून्यावादातून एक भयंकर प्रकार घडला आहे, ज्यात एका तरुणाचा मृत्यू झालेला असून ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
जुन्या वादाची ठिणगी पेटली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू तरुणाचे नाव शुभम मिश्रा (वय31) असे असून शुभम आणि काही जणांमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू होता. त्याच जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेच्या रात्री घडलं काय?
घटनेच्या रात्री आरोपींनी शुभम यांना अडवून त्यांच्यावर दगडाने वार केले. गंभीर मारहाण झाल्यामुळे शुभम यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. तसेच संशयितांचा शोध सुरू असून काही जणांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट होत असले तरी नेमके कारण काय होते याचा तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : मध्यरात्री अडवलं अन् दगडाने...;नालासोपाऱ्यात जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement