मतचोरीसाठी बोगस आधारकार्ड कसं बनवलं जातंय? रोहित पवारांनी थेट ट्रम्प तात्यांचं कार्ड बनवलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rohit Pawar:रोहित पवार यांनी गुरूवारी एक पाऊल पुढे टाकत प्रात्याक्षिक दाखवत मतचोरीसाठी आधार कार्डचा वापर कसा होतो, खोटे आधार कार्ड कसे बनवले जाते, मतदार यादीत कसे दोष आहेत हे वेगवेगळ्या मतदारसंघातील उदाहरणे सांगत दाखवून दिले.
मुंबई : मतदार यादीतील घोळाविरोधात राज्यात विरोधक आक्रमक झालेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मतचोरी कशी केली जातेय, हे प्रात्याक्षिकासह दाखवून दिले. बोगस मतदार नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनवून मतचोरीसाठी आधारकार्डचा वापर होत असल्याचे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेली दोन दिवस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील घोळ, दुबार मतदान आदी विषयांवर आक्षेप घेतले. जोपर्यंत यंत्रणेची तयारी होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला, अशी मागणीही त्यांनी केली. गुरुवारी रोहित पवार यांनी एक पाऊल पुढे टाकत प्रात्याक्षिक दाखवत मतचोरीसाठी आधार कार्डचा वापर कसा होतो, खोटे आधार कार्ड कसे बनवले जाते, मतदार यादीत कसे दोष आहेत हे वेगवेगळ्या मतदारसंघातील उदाहरणे सांगत दाखवून दिले.
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो वापरून आधारकार्ड बनवून दाखवलं
मतदार वगळण्यासाठी फॉर्म 6चा गैरवापर होतोय. विरोधातले मतदार मृत दाखवलेत तर मृत व्यक्तींच्या नावावर मतदान झाले आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. मतदार यादीतील घोळ दाखवत रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला सवाल केलेत. यावेळी त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो वापरून आधारकार्ड बनवून दाखवलंय. मतचोरीसाठी आधारकार्डचा वापर केला जातोय, असे सांगतानाच बोगस आधारकार्ड कसं बनवलं जातं हे दाखवण्यासाठी रोहित पवारांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे आधारकार्ड बनवून, त्यांचा पत्ता पांढरा बंगला कर्जत असे लिहिला, त्यांची जन्मतारीखही लिहिली.
advertisement
माणसं शोधायला गेल्यावर पत्त्यावर कुणीच नाही
विरोधातील मतदार मयत दाखवण्यात आले. सहा महिन्यात 48 लाख मतदार कसे वाढले? माणसं शोधायला गेल्यावर पत्त्यावर कुणीच नाही. धुळे ग्रामीण मतदार यादीत एकाच पत्त्यावर 4 जुळे मिळून आले. अचानक वाढलेले मतदार कुठून आले, कसे आले याची माहिती निवडणूक आयोगाने द्यायला हवीत. याद्यांमधील घोळ नीट होईपर्यंत निवडणुका का घेता? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतचोरीसाठी बोगस आधारकार्ड कसं बनवलं जातंय? रोहित पवारांनी थेट ट्रम्प तात्यांचं कार्ड बनवलं