Nanded : सक्षम ताटे हत्या प्रकरणी कोर्टातून आली नवी अपडेट, 'त्या' दोघांचं काय झालं?
- Published by:Sachin S
Last Updated:
समक्ष ताटे याचा 27 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. आंतरजातीय प्रेम संबंधातून त्याची प्रेयसी आंचल हिच्या वडिलांनी आणि दोन भावांनी अन्य दोन आरोपींच्या मदतीने खून केला होता.
नांदेड : नांंदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणी आंचलचे वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे. चारही आरोपींना आज न्यायलायात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने अधिक तपासासाठी आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पण, या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार आहे.
प्रेमसंबंध आणि आंतरजातीय विरोधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. प्रकरणी आंचल मामीलवारचे वडील गजानन मामीलवार, भाऊ हिमेश मामीडवार, लहान भाऊ साहिल मामीडवार आणि यांच्यासह जयश्री मामीडवार -ठाकूर या महिलेला अटक करण्यात आली होती.
कोठडी संपल्यामुळे आज आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. चार आरोपीच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसाची वाढ करण्यात आली. समक्ष ताटे याचा 27 नोव्हेंबर रोजी खून झाला होता. आंतरजातीय प्रेम संबंधातून त्याची प्रेयसी आंचल हिच्या वडिलांनी आणि दोन भावांनी अन्य दोन आरोपींच्या मदतीने खून केला होता. 28 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेव्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
advertisement
अल्पवयीन आरोपींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर एक तारखेला पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा आंचलची आई जयश्री मामीडवार हिला न्यायालयीन कोठडी तर गजानन मामीडवार , साहिल मामिडवार सह अन्य दोघांना तीन दिवसाची कोठडी सुनावणयात आली होती. आज पुन्हा या आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण आठ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी अजूनही फरार आहे. या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
view commentsLocation :
Nanded Waghala,Nanded,Maharashtra
First Published :
December 04, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded : सक्षम ताटे हत्या प्रकरणी कोर्टातून आली नवी अपडेट, 'त्या' दोघांचं काय झालं?


