Sambhaji Bhide : 'आपली लायकी काय तर...संविधान', संभाजी भिडेचं उद्विग्न विधान! म्हणाले 'दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा'

Last Updated:

Sambhaji Bhide Controversial statement : आपली लायकी त्या संविधानात, आणि पोटात मुरड आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान, कसलं संविधान बोलता? अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संविधानाबाबत आपली उद्विग्नता व्यक्त केलं आहे.

News18
News18
Sambhaji Bhide Controversial statement : आपल्या प्रत्येक भाषणात वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सांगली येथील कार्यक्रमात पुन्हा एकदा असेच विधान करुन नवीन वाद ओढवून घेतला आहे. यावेळी त्यांनी संविधानावर उद्विग्नरित्या टीका केली. तसेच दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे, असं मत देखील संभाजी भिडेंनी यावेळी मांडलं आहे. तसेच भारत निर्लज्ज लोकांचा देश असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

कसलं संविधान बोलता? - संभाजी भिडे

जगात 187 देश आहेत, आपली लायकी काय, तर आपली लायकी त्या संविधानात, आणि पोटात मुरड आल्याप्रमाणे विद्वान लोक बोलतात संविधान, कसलं संविधान बोलता? अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी संविधानाबाबत आपली उद्विग्नता व्यक्त केलं आहे. तसेच 1300 वर्ष मुस्लिम, युरोपियनांच्या पारतंत्र्यात एखादा जीव खितपत पडलेल्या लोकांचा देश असून ज्यांना लाज वाटत नाही, ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नसलेला निर्लज्ज लोकांचा देश आहे, असं संभाजी भिडे म्हणाले.
advertisement

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडी

आम्हाला फक्त स्वराज्य, स्वातंत्र्य नको आहे, हिंदवी स्वातंत्र्य हवे आहे, असे विधान देखील संभाजी भिडे यांनी केले आहे, ते सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड प्रसंगी बोलत होते. सांगलीत नवरात्रीच्या औचित्याने दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. या दौडीमध्ये धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहे. त्यांनी वयाच्या पंधराव्यावर्षी विस्कटलेले नवत्रत दुरुस्त करण्याची शपथ घेतली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो.
advertisement

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा

दरम्यान, ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता. गणपती उत्सव, नवरात्रमध्ये दांडिया खेळून वाटोळे केले. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे, असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sambhaji Bhide : 'आपली लायकी काय तर...संविधान', संभाजी भिडेचं उद्विग्न विधान! म्हणाले 'दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा'
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement