सांगली जिल्हा परिषद निकाल 2026 : सांगलीतील पहिला निकाल हाती, रोहित पाटलांच्या उमेदवाराने उधळला गुलाल!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sangli ZP election result 2026 : मिरज आणि वाळवा या दोन तालुक्यांत सर्वाधिक प्रत्येकी 11 गट असून, या ठिकाणचा निकाल जिल्ह्याच्या सत्तेची गणिते ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
Sangli ZP election result 2026 : सांगलीमध्ये पक्षीय ताकदीचा विचार करता भाजपने सर्वाधिक 50 गटांत आपले उमेदवार उभे करून आघाडी घेतली होती. तर शिवसेना शिंदे गट 32 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील 32 गटांत ताकदीने उतरले होते. मिरज आणि वाळवा या दोन तालुक्यांत सर्वाधिक प्रत्येकी 11 गट असून, या ठिकाणचा निकाल जिल्ह्याच्या सत्तेची गणिते ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना असला, तरी काही तालुक्यांत अंतर्गत संघर्ष देखील तीव्र होता. खानापूर आणि आटपाडी सारख्या भागात भाजप आणि शिंदे गटात थेट लढत होत होती, तर तासगावमध्ये दोन राष्ट्रवादी आमनेसामने होते. राजकीय तज्ज्ञांच्या मते, यावेळी सांगलीमध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत चुरशीची होणार होती.
advertisement
यावेळच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा महिलाराज कडे जाणार आहेत. अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली असून महिला उमेदवारांच्या निवडीवर विशेष भर दिला आहे.
सांगलीतील पहिला निकाल हाती
मांजर्डे जिल्हा परिषद निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहन नाना पाटील विजयी झाले आहेत.
advertisement
सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसने खातं उघडलं आहे. पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजय झाले आहेत. ऋषिकेश लाड काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे आहेत.
जत तालुक्यातल्या जाडरबोबलाद जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या उमेदवाराने खातं उघडलं. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सावित्री तमनगौडा रवी पाटील विजय झाले आहेत.
advertisement
येलूर जिल्हा परिषद मतदार संघ भाजपाच्या हर्षदा राहुल महाडीक विजयी झाल्या आहेत.
सांगलीतील पहिल्या तासाभराचं चित्र समोर आलं आहे.
खानापूर पंचायत समितीच्या आठ गणात सर्व जागांत शिंदे शिवसेना आघाडीवर
सांगली जिल्हा परिषद 61 गट निवडणूक निकाल - आघाडी*
भाजपा - 12 जागांववर
राष्ट्रवादी अजित पवार - 04 जागांवर आघाडीवर
advertisement
शिवसेना शिंदे - 04 जागांवर आघाडीवर
काँग्रेस - 06 जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार - 08 जागांवर
शिवसेना ठाकरे गट - 01
सांगली 10 पंचायत समिती 122 गण- आघाडी
भाजपा - 16
राष्ट्रवादी अजित पवार - 08
शिवसेना शिंदे - 08
काँग्रेस - 12
राष्ट्रवादी शरद पवार - 09
शिवसेना ठाकरे गट - 01
advertisement
वाळवा तालुक्यातील येलूर जिल्हा परिषद गटातीलभाजपच्या हर्षदा महाडिक आघाडीवर
कामेरी जिल्हा परिषद गटातील भाजपचे जयराज पाटील आघाडीवर
वाळवा तालुक्यातील चिकूर्डे गटात उद्धव ठाकरे सेनेचे अभिजित पाटील आघाडीवर
Location :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
सांगली जिल्हा परिषद निकाल 2026 : सांगलीतील पहिला निकाल हाती, रोहित पाटलांच्या उमेदवाराने उधळला गुलाल!







