जमिनीवर पाडलं अन् तलवारीने भोसकलं, सांगलीत तरुणाने जन्मदातीला अमानुषपणे संपवलं

Last Updated:

तासगावच्या इंदिरानगरमध्ये जगन चरण पवारने दारूच्या नशेत आई शांताबाई चरण पवार यांची तलवारीने हत्या केली. पोलिसांनी जगनला अटक केली असून परिसरात हळहळ आहे.

News18
News18
तासगाव: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात एक माणुसकीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, यात आईचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण हत्याकांडामुळे तासगाव शहर हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शांताबाई चरण पवार (वय ७०) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांचा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) घरी आला. यावेळी जगन हा दारूच्या नशेत होता. रात्री उशिरा घरी आल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून तीव्र वाद झाला.
हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने आई शांताबाई यांना धक्का दिला. त्या खाली जमिनीवर कोसळल्या. यावेळी संतापाच्या भरात जगनने घरात असलेली तलवार काढली आणि जमिनीवर पडलेल्या आईला तलवारीने भोसकले. तलवारीचे घाव वर्मी लागल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

संशयित आरोपीला अटक

या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत संशयित मुलगा जगन पवार याला ताब्यात घेतले. मध्यरात्री त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोटच्या मुलानेच अशाप्रकारे जन्मदात्या आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेच पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
जमिनीवर पाडलं अन् तलवारीने भोसकलं, सांगलीत तरुणाने जन्मदातीला अमानुषपणे संपवलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement