सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल: नेत्यांच्या घरातले जिंकले की पडले? कुणाला किती मतं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Satara ZP Election Results Live: सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जिल्हा परिषद गटात निवडणूक झाली. तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांअंतर्गत एकूण १३० जागांसाठी निवडणूक झाली. सातारा जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येणार, पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा असणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. साताऱ्यात ६७.८० टक्के मतदान झाले आहे.
साताऱ्यात काय होणार?
सातारा तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १६ गणांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये ६२.४२ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांना मनोज घोरपडे, महेश शिंदे यांची ताकदही मिळाली आहे. दुसरीकडे शशिकांत शिंदे, मकरंद आबा पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.
advertisement
अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक अत्यंत साधेपणाने पार पडली. दर खेपेस होतात तशा प्रचारसभा झाल्या नाहीत. तरीही पदयात्रा, कोपरासभा, मतदारांच्या भेटीगाठी यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून गेले होते.
नेत्यांच्या घरातले जिंकणार की पडणार?
कराडच्या येळगाव जिल्हा परिषद गटातून दिवंगत नेते, विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या विरुद्ध विलासकाकांचे पुतणे आनंदराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
advertisement
औंध जिल्हा परिषद गटातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वहिनी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे यांनी निवडणूक लढवली आहे.
आंधळी जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दिपाली जगदाळे यांनी आव्हान उभे केले आहे.
advertisement
कोरेगावचे शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे या भाजपकडून खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे गेव्या लढवली. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल पाटील यांचे त्यांना तगडे आव्हान आहे.
पाटणच्या मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्राची नरेंद्र पाटील यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. शिवसेनेकडून मृणाल पाटील यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.
advertisement
फलटणचे दिवंगत आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सह्याद्री कदम यांनी कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली, त्यांच्यासमोर भाजपच्या जयकुमार शिंदे यांचं आव्हान होतं.
सातारा विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या अरुणादेवी पिसाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बावधन जिल्हा परिषद गटातून अरुणादेवी पिसाळ यांच्या कन्या दिप्ती पिसाळ यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात ऋतुजा शिंदे यांचे आव्हान आहे.
advertisement
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशिल कदम यांची भावजय तेजस्विनी विक्रमशिल कदम यांच्या समोर राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ यांचे आव्हान आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 8:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल: नेत्यांच्या घरातले जिंकले की पडले? कुणाला किती मतं?









