Mumbai : 'ती' भयाण सकाळ! चिमुकली दुकानातून घरी आली अन् आईने पळत पोलिस स्टेशन गाठलं; वडाळ्यातील धक्कादायक प्रकार
Last Updated:
Mumbai Crime News: वडाळ्यात बिस्किटं आणण्यासाठी गेलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत भयानक प्रकार घडलेला आहे. स सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने केवळ तीन वर्षांच्या चिमुकलीला आपल्या वासनेचा शिकार बनवण्याचा प्रयत्न केला.
घराबाहेर पडलेली लेक रडत घरी परतली
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित चिमुकली जवळच असलेल्या एका दुकानात बिस्किटं आणण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित असलेल्या नराधम तरुणाने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले. त्याने आधी मुलीला तिची चप्पल दुकानाबाहेर काढायला लावून तिला आत बोलावले. त्यानंतर कोणीही आसपास नसल्याची संधी साधून त्याने या चिमुकलीशी अत्यंत अश्लील आणि लैंगिक चाळे केले.
advertisement
आईची पोलिसात धाव
मुलगी घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने तातडीने वडाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली असून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शनिवारी सापळा रचून या नराधम आरोपीला अटक केली आहे.
सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा घटनांमुळे परिसरात पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 1:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : 'ती' भयाण सकाळ! चिमुकली दुकानातून घरी आली अन् आईने पळत पोलिस स्टेशन गाठलं; वडाळ्यातील धक्कादायक प्रकार







