advertisement

Spirit Movie: दीपिका पादुकोणनंतर 'स्पिरिट'मधून आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट, दिग्दर्शकांसोबत मतभेद; नेमकं कारण काय?

Last Updated:

Prakash Raj Out From Spirit Movie: अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने चित्रपटातून एक्झिट झाली आहे.

Spirit Movie: दीपिका पादुकोणनंतर 'स्पिरिट'मधून आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट, दिग्दर्शकांसोबत मतभेद; नेमकं कारण काय?
Spirit Movie: दीपिका पादुकोणनंतर 'स्पिरिट'मधून आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट, दिग्दर्शकांसोबत मतभेद; नेमकं कारण काय?
मुंबई: संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'स्पिरिट' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची स्टारकास्ट चर्चेत आहे. आठ तासांच्या शिफ्टमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणमध्ये आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमध्ये मोठा वाद झाला, त्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटातून एक्झिट घेतली. आता तिच्यानंतर आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची दिग्दर्शकासोबत काही चित्रपटासंबंधित कारणामुळे वाद झाला. त्यामुळे अभिनेत्याने चित्रपटातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित, 'स्पिरिट' चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता प्रकाश राजने एक्झिट घेतली आहे.
ओटीटी प्लेने दिलेल्या वृत्तानुसार आणि सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातल्या एका सीनवरून प्रकाश राज आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. चित्रपटाच्या सेटवरंच एका सीनच्या स्क्रिप्टवरून दोघांमध्ये वाद झाला होता. शुटिंगच्या वेळी प्रॉडक्शन टीमबरोबर सुद्धा वाद झाला होता. सेटवरील अडचणी आणि कामाच्या शैलीतील फरकांमुळे हा वाद उद्भवल्याचा अंदाज आहे. शिवाय, प्रकाश राज आणि संदीप रेड्डी वांगा यांच्यातील मतभेदांनंतर अद्याप कोणाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्पिरिट चित्रपट टी-सीरीज आणि भद्रकाली पिक्चर्स यांच्या बॅनर खाली तयार केला जात आहे. चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणची जागा तृप्ती डिमरीने घेतली आहे. विवेक ओबेरॉय आणि कंचना हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
आता, प्रकाश राज चित्रपटात परतणार की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. खरंतर, यापूर्वी प्रकाश राज यांचं चित्रपटाच्या टीमसोबत किंवा निर्मात्यांसोबत काही कारणांमुळे मतभेद झाल्याचे म्हटले जाते. आता यावेळी सुद्धा प्रकाश राज यांचं स्पिरिटच्या निर्मात्यांसोबत आणि चित्रपटाच्या टीमसोबत चित्रपटातील काही क्रिएटिव्ह गोष्टींमुळेच वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आणखी इतर कोणत्या कारणामुळे वाद झालाय का? याची अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. संदीप रेड्डी वांगा चित्रपटाचं सध्या हैद्राबादमध्ये शुटिंग सुरू आहे. या बहुचर्चित चित्रपटात नेमके कोणकोणते कलाकार दिसणार ? यासाठी चाहते उत्सुक आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Spirit Movie: दीपिका पादुकोणनंतर 'स्पिरिट'मधून आणखी एका अभिनेत्याची चित्रपटातून एक्झिट, दिग्दर्शकांसोबत मतभेद; नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement