शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के, अंबरनाथमध्ये भाजपने आता व्यापरी संघाचा पदाधिकारी फोडला
- Published by:Prachi Amale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतर ही फोडाफोडी थांबायला हवी होती, पण ती अधिकच वाढल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे.
ठाणे : राज्यात महायुती असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकमेकांचे नेते, पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये लागली आहे. यावरून महायुतीत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत अमित शाह यांच्याकडे फोडाफोडी थांबवा, अशी विनंती केली. खरतर या दिल्लीवारीनंतर ही फोडाफोडी थांबायला हवी होती, पण ती अधिकच वाढल्याचे चित्र ठाण्यात दिसत आहे.
राज्यात एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असताना दुसरीकडे पुन्हा अंबरनाथमध्ये चक्का रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे फोडाफोडीचा वाद दिल्लीत गेल्यानंतर ही महायुतीत फोडाफोडीचे राजकारण सुरुच आहे.
रुपसिंग धल यांचा अंबरनाथमध्ये व्यापारी संघात मोठा दबदबा
अंबरनाथमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे व्यापारी संघाचे मुख्य पदाधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी पक्ष प्रवेश केला आहे. रुपसिंग धल यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. रुपसिंग धल यांचा अंबरनाथमध्ये व्यापारी संघात मोठा दबदबा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का
अंबरनाथमधील स्थानिक शिवसेना नेत्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून केला पक्ष प्रवेश केल्याचे म्हणणे आहे. आता शिवसेना भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असून शिवसेना कोणाची पक्ष प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, नगरपालिका निवडणुकीतील फोडाफोडीच्या या राजकारणात ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
पळवापळवी सुरूच
दरम्यान, महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावरुन शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमध्ये यापुढे कोणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व उमेदवार घ्यायचे नाहीत, असे ठरल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर देखील पळवापळवी सुरू आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
November 25, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के, अंबरनाथमध्ये भाजपने आता व्यापरी संघाचा पदाधिकारी फोडला









