advertisement

'तो आमचा नव्हेच, गर्दी होती त्यामुळे कळलं नाही', गुंडाच्या प्रवेशावर सर्वत्र टीकेनंतर शिंदे गटाने हात वर केले!

Last Updated:

Yuvraj Mathankar: युवराज माथनकर नामक गुंडाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वत्र टीका होत होती. अखेर टीकेनंतर शिंदे गटाने स्पष्टीकरण देताना प्रवेश झालाच नाही, असे सांगत वृत्ताचे खंडन केले आहे.

युवराज माथनकरच्या शिंदे गटाच्या प्रवेशाचे सेनेकडून खंडन
युवराज माथनकरच्या शिंदे गटाच्या प्रवेशाचे सेनेकडून खंडन
नागपूर : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. नागपुरात एका सराईत गुंडाने शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त होते. सराईत गुंड युवराज माथनकरने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले गेले. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरांमध्ये माथनकर याचा प्रवेश कैद झाला. त्याच्या प्रवेशानंतर शिवसेना शिंदे गटावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र सर्वत्र टीकेनंतर शिंदे गट शिवसेनेने हात वर केले आहेत.
नागपुरात शिवसेनेचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये आमच्या पक्षात युवराज माथनकर नामक व्यक्तीचा प्रवेश झाल्याचे माध्यमांमधील बातम्यांनीच आम्हाला कळाले. परंतु असा कोणताही पक्ष प्रवेश झाला नाही, असे सांगत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुरज गोजे यांनी प्रवेशाचे वृत्त फेटाळले.
आमच्या पक्ष प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माथनकर याचे नाव नव्हते. युवराज माथनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी प्रवेश केल्याची माहिती नाही. काल पक्ष प्रवेश होताना मोठ्या संख्येने गर्दी होती. याच गर्दीत तो कोणासोबत तरी आला असावा, त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकण्यात आला असावा. याचा आणि पक्ष प्रवेशासाठी काहीही संबंध नाही. त्यामुळे पक्षाची बदनामी थांबवावी, असे सुरज गोजे म्हणाले.
advertisement
युवराज माथनकर मंचावरील व्हिडीओत दिसत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री हे नगर विकास मंत्री असल्याने अनेक लोक काम घेऊन येतात, तसा तो पण आला असू शकतो. तो दिसत आहे हे आम्ही नाकारत नाही पण पक्ष प्रवेशाशी त्याचा संबंध नाही, असे सुरज गोजे म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तो आमचा नव्हेच, गर्दी होती त्यामुळे कळलं नाही', गुंडाच्या प्रवेशावर सर्वत्र टीकेनंतर शिंदे गटाने हात वर केले!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement