Nagar Parishad Election: निवडणुकाच्या नावानं चांगभलं, शिवसेना शिंदे गटाची शरद पवारांच्या NCP सोबतच युती!
- Published by:Sachin S
- Reported by:BABBU SHAIKH
Last Updated:
एकत्रितपणे निवडणूक लढविणे अपेक्षित होते मात्र युती आणि आघाडीच्या धर्माला तिलांजी देत आपल्या सोयीनुसार कट्टर विरोधी असलेल्या पक्षा सोबत युती, आघाडी केल्याचे दिसून येत आहे
येवला : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी सर्वच पक्षांची ही राजकीय चाचणी समजली जात आहे. काही ठिकाणी महायुतीत फुट पडली आहे तर काही ठिकाणी एकत्र लढत आहे. पण, अशातच नाशिक जिल्ह्यातील येवला नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादीची युती झाली आहे. विशेष म्हणजे, मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात सेना उमेदवाराच्या प्रचारासाठी मंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी कामाला लागले आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविणे अपेक्षित होते मात्र युती आणि आघाडीच्या धर्माला तिलांजी देत आपल्या सोयीनुसार कट्टर विरोधी असलेल्या पक्षा सोबत युती, आघाडी केल्याचे दिसून येत आहे, अशीच एका युती येवल्यात झाली असून इथं शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीला बाजूला ठेऊन थेट शरद पवार राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली आहे.
advertisement
या ठिकाणी आमदार किशोर दराडे यांचे पुतणे शिवसेनेचे रुपेश दराडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात एंट्री केली. भुसे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर प्रचार रॅलीत ही सहभागी झाले. त्यांच्या सोबत शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी देखील होते. यावेळी मंत्री भुसे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता शहराच्या विकासाबाबत जोरदार टीका केली.
advertisement
अजित पवार राष्ट्रवादी ऐवजी युती न करता शरद पवार राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय का घेण्यात आला, असे विचारल्यावर येवल्यात शिवसेनेची ताकत असताना उचित मान देण्यात आला नाही म्हणून दुसरी राष्ट्रवादीसोबत युती केल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
November 22, 2025 11:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election: निवडणुकाच्या नावानं चांगभलं, शिवसेना शिंदे गटाची शरद पवारांच्या NCP सोबतच युती!


