एकनाथ शिंदेंचा महायुतीकडूनच होतोय गेम? बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडली व्यथा, शिवसेनेकडून स्वबळाची तयारी

Last Updated:

जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसं तशी महायुतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी महायुतीच्या पक्षांमध्ये कुरघोडी बघायला मिळत आहेत.

News18
News18
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कुठल्याही क्षणी राज्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. जसजशी निवडणूक जवळ येत आहे. तसं तशी महायुतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. जिल्हा पातळीवर अनेक ठिकाणी महायुतीच्या पक्षांमध्ये कुरघोडी बघायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत महायुतीतील युतीबाबत पक्षातून तीव्र नाराजीचा सूर उमटल्याचं दिसून आला. नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीऐवजी स्वतंत्र निवडणूक लढण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली.
आमदार आणि जिल्हाप्रमुखांनी बैठकीत आपली व्यथा मांडताना स्पष्ट केले की, महायुतीतील मित्रपक्षांकडून युतीधर्म पाळला जात नाहीये. उलट, येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांना महायुतीतील सहकारी पक्षांत प्रवेश दिला जात आहे. 'मतदार संघात आम्हाला संपवण्याचं काम सुरू आहे,' अशी कैफीयत पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडली. विशेष म्हणजे, नंदूरबारमधील एका शिवसेना आमदाराने तर शिवसेनेच्याच माजी जिल्हाप्रमुखांवर गंभीर आरोप केले. ते भाजपसाठी काम करत असल्याचं सांगत, पक्षात असलेल्या 'झारीतील शुक्राचार्यां'कडे नेत्यांचे लक्ष वेधले.
advertisement
मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये युतीबाबत अजूनही मोठे मतभेद असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर, वसई-विरार आणि भिवंडी या महत्त्वाच्या नगरपालिकांमध्येही शिवसेना-भाजप युतीबाबत संभ्रम कायम आहे. दोन्ही पक्षांनी खबरदारी म्हणून स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ठाण्यात संजय केळकर आणि नवी मुंबईतून गणेश नाईक यांसारख्या भाजप नेत्यांकडून उघडपणे स्वतंत्र निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्ये होत असल्याने शिवसेनेकडूनही 'स्वबळा'ची तयारी सुरू करण्यात आली आहे.
advertisement
महायुतीतील या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाढत्या मतभेदाचा थेट फटका महायुतीला बसू शकतो, तर विरोधकांना काही ठिकाणी नक्कीच फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तिढा तीनही पक्षांतील प्रमुख वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याशिवाय सुटणार नाही. समन्वयासाठी नेमलेल्या नेत्यांच्या बैठकांमधूनही कुठलाही तोडगा निघणार नाही, जोपर्यंत वरिष्ठ नेते यात लक्ष घालणार नाहीत. लवकरच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या बैठका होणार आहेत, मात्र त्या विभागांतील जिल्ह्यांमध्येही परिस्थिती काही वेगळी नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे मतभेद मिटवताना तीनही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदेंचा महायुतीकडूनच होतोय गेम? बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडली व्यथा, शिवसेनेकडून स्वबळाची तयारी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement