Solapur: उज्वला थिटे यांच्या पदरी पुन्हा निराशा, सोलापूर कोर्टातून मोठी बातमी, अनगर नगर परिषद निवडणुकीची महत्त्वाची अपडेट
- Published by:Sachin S
Last Updated:
नराध्याक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात उज्वला थिटे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूक यावेळी उमेदवाराचा अर्ज बाद आणि राजन पाटील यांच्या मुलाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डिवचल्यामुळे चांगलीच गाजली. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. थिटे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयात थिटे यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे थिटे यांच्या पदरी निराशा आली आहे.
advertisement
सोलापूर अनगर नगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुरस्कृत उमेदवार उज्वला थिटे यांचा नराध्याक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात उज्वला थिटे यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे थिटे यांना मोठा धक्का बसला आहे.
-अनगर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. भाजप नेते राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे मैदानात उतरल्या होत्या. पण, आदल्यादिवशीच निवडणूक अधिकाऱ्यांनी सुचकाची स्वाक्षरी नाही, असं सांगून थिटे यांचा अर्ज बाद केला होता. निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरोधात थिटे यांनी न्यायलयात धाव घेतली. आज दोन्हीही वकिलाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दिवसभरात झालेल्या चर्चेतून अखेर अपील फेटाळला आहे. अपील फेटाळल्यामुळे उमेश पाटील यांना मोठ्या प्रमाणावर धक्का बसला आहे.
advertisement
प्राजक्त पाटील यांची अडचण दूर
दरम्यान, उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याचं समोर येताच निवडणूक बिनविरोध करण्यात आली. फक्त एका अपक्षाचा अर्ज होता. त्या अपक्षानेही माघार घेतली. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्राजक्ता पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला होता. राजन पाटील यांच्या मातोश्री बंगल्यासमोरून प्राजक्ता पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली होती.
advertisement
उज्वला थिटे यांचा अपील न्यायालयाने फेटाळताच अनगरमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. अनगर नगरपंचायती समोर फटाक्याची अतिशबाजी करत जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केलं होतं. उज्वला थिटे यांचा सुचकाची सही नसल्याने अर्ज बाद झाला होता. त्यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळला.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
November 26, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: उज्वला थिटे यांच्या पदरी पुन्हा निराशा, सोलापूर कोर्टातून मोठी बातमी, अनगर नगर परिषद निवडणुकीची महत्त्वाची अपडेट


