advertisement

पुण्यात रक्तरंजित कांड, मध्यरात्री हॉटेलच्या मागे तरुणाचा चिरला गळा, सकाळी उडाली खळबळ

Last Updated:

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात एका ३० वर्षीय परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

News18
News18
सचिन तोडकर, प्रतिनिधी पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात एका ३० वर्षीय परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

सुकेन महातो असं हत्या झालेल्या ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेन याचा मृतदेह कोरेगाव भीमा येथील एका हॉटेलच्या पाठीमागे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून सुकेनला संपवले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

पोलीस तपासासाठी श्वान पथक तैनात

advertisement
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातून काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी तुळशीराम महातो यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात रक्तरंजित कांड, मध्यरात्री हॉटेलच्या मागे तरुणाचा चिरला गळा, सकाळी उडाली खळबळ
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement