advertisement

Thane: पहिल्याच महासभेत उपमहापौरांचा राजीनाम्याचा इशारा, भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी, जोरदार राडा

Last Updated:

Thane Mahapalika BJP vs Shiv Sena: ठाणे महापालिकेची पहिलीच महासभा सोमवारी संपन्न झाली. या महासभेत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

ठाणे महापालिकेत जोरदार राडा
ठाणे महापालिकेत जोरदार राडा
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली खरी परंतु सत्ता स्थापनेच्या १५ दिवसांनंतर लगोलग त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नसतील तर आम्ही सत्तेबाहेर पडू, राजीनामा देऊ, असा इशारा भाजप नेते, ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिला. त्यामुळे भाजप-सेनेचा संसार पुढची पाच वर्षे नीटपणे चालणार का? अशी चर्चा ठाण्यात सुरू आहे.
ठाणे महापालिकेची पहिलीच महासभा सोमवारी संपन्न झाली. या महासभेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी हजेरी लावली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना शिवसेना जाणून बुजून बोलू दिले जात नसल्याचा आरोप करीत नगरसेवकांनी सभेतून वॉकआऊट केले.

भाजपने केले महासभेतून वॉकआऊट, ठाणे महापालिकेत सेना-भाजपमध्ये खडाजंगी

⁠पहिल्याच महासभेत भाजप शिवसेनेत खडाजंगी पाहायला मिळाली. आम्हाला बोलू दिले जात नाही असे सांगत भाजप महिला नगरसेविकांनी घोषणाबाजी केली. आम्हाला प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर आम्ही सत्तेबाहेर पडण्यास तयार आहोत, असा थेट इशारा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिला. तसेच त्यांनी महासभेतून वॉकआऊटही केले.
advertisement

पहिल्याच महासभेत भाजप शिवसेनेविरोधात आक्रमक

महासभेच्या सुरुवातीलात भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. ⁠आम्ही जनतेला बांधील आहोत. आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळालीच पाहिजेत, असे सांगत भाजपा नगरसेवक शिवसेनेविरोधात आक्रमक झाले होते.

आधी विरोधात बसण्याची भूमिका, नंतर समीकरण जुळल्याने भाजप सत्तेत सहभागी

सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षासोबत महापालिकेत सत्ता स्थापन करणार नाही, असा पवित्रा घेतला. आमचा मानसन्मान ठेवला तर ठीक नाहीतर आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधात बसणे पसंत करू, अशी भूमिका भाजपने घेतली. परंतु नंतर सत्तावाटपाच्या वाटाघाटीत समीकरण जुळल्याने भाजपने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane: पहिल्याच महासभेत उपमहापौरांचा राजीनाम्याचा इशारा, भाजप-शिंदेसेनेत खडाजंगी, जोरदार राडा
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement