advertisement

Rashmika Mandanna - Vijay Deverakonda : 9 वर्ष गुपचूप करत होते डेट, सीक्रेट ट्रिपवर फॅन्सनी पकडलं; अशी सुरू झाली रश्मिका-विजयची Love Story

Last Updated:
Rashmika Mandanna - Vijay Deverakonda Love Story : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. आम्हाला आता #VIROSH म्हणा असं त्यांनी अधिकृतपणे सांगितलं. पण या दोघांची चोरीछुपे लव्ह स्टोरी सुरू कधी झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतूर आहेत. 
1/9
विजय आणि रश्मिका यांनी नुकतेच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या लग्नाची घोषणा केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की त्यांच्या लग्नाला 'द वेडिंग विरोश' असेल. हे नाव त्यांच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट आहे दोघांनी वर्षांपूर्वी त्यांची नावे एकत्र करून VIROSH हे नाव निवडलं आहे. 

2/9
विजय आणि रश्मिका आता त्यांच्या आयुष्याच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहेत. त्यांची सुंदर कहाणी कशी सुरू झाली ते पाहूया. विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी 2017 मध्ये गीता गोविंदम चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. योगायोगाने त्याच वेळी अभिनेता रक्षित शेट्टीसोबत रश्मिकाचं लग्न मोडलं होतं. 

3/9
शूटिंग दरम्यान विजय आणि रश्मिका यांच्यात पडद्यामागे एक चांगली मैत्री निर्माण झाली. पुढे ते प्रेमात पडले.  गेली अनेक वर्ष दोघांनी त्यांच्या रिलेशनबद्दल चांगलीच गुप्तपा पाळली. कोणालाही काहीही कळू दिलं नाही. 

4/9
2018 मध्ये जेव्हा 'गीता गोविंदम'च्या रिलीज वेळी दोघांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांची जोडी अभिनय करत आहे असे वाटत नव्हते. हा चित्रपट सुपरहिट ठरला ज्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी 'डियर कॉम्रेड' मध्ये पुन्हा एकत्र काम केलं.

5/9
सिनेमाच्या प्रमोशन दरम्यानच्या त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांची जवळीक स्पष्टपणे दिसून आली. विजय अनेकदा रश्मिकाच्या मेहनतीचे कौतुक करत असे तर रश्मिकाने त्याला तिचा आवडता सहकलाकार आणि खूप मदत करणारा माणूस म्हटलं होतं तेव्हापासून त्यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

6/9
त्याचवेळी दोघे एकत्र सुट्ट्यांवर गेले होते. चाहत्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटोवरून हे ओळखलं होतं. दोघे एकाचवेळी पण वेगवेगळे एअरपोर्टवर स्पॉट होऊ लागले होते.  रश्मिकाने विजयच्या कौटुंबिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहण्यास सुरुवात केली होती. दोघे एकमेकांचे बर्थडे देखील सेलिब्रेट करत होते.

7/9
जेव्हा जेव्हा त्यांना डेटिंगबद्दल थेट प्रश्न विचारला जात असे, तेव्हा दोघेही उत्तर देण्यास टाळाटाळ करायचे. विजयने एकदा एका मुलाखतीत म्हटले होते की तो योग्य वेळ आल्यावरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करेल. रश्मिकाने असेही म्हटले होते की तिला तिच्या प्रायव्हसीची कदर आहे. 

8/9
अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एक घटना घडली ज्यामुळे या चर्चा आणखी वाढल्या. स्टेजवर होस्ट नंदमुरी बालकृष्ण विजयच्या नावाबद्दल रश्मिकाची छेड काढत होते. जवळ बसलेल्या रणबीर कपूरनेही तिला फोन करायला सांगितले. रश्मिकाने विजयला फोन करताच विजयने सहज उत्तर दिले, 'काय चाललंय रे.'

9/9
फोन लाऊडस्पीकरवर आहे हे लक्षात येताच रश्मिकाला खूप लाजली होती. याचवेळी दोघे एकमेकांना डेट करत आहेत हे क्लिअर झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नव्हती पण दोघेही प्रेमात आहेत याची चाहत्यांना खात्री पटली होती. विजय देवरकोंडा आणि रश्मिका येत्या 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. 

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement