advertisement

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा मोठा डाव; कोण आहेत सुरेश म्हात्रे?

Last Updated:

Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे रिंगणात उतरल्याने लढत तुल्यबळ होण्याची चर्चा आहे.

शरद पवारांचा मोठा डाव
शरद पवारांचा मोठा डाव
नवी मुंबई, (प्रमोद पाटील, प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. भाजपच्या कपिल पाटील यांच्यासमोर शरद पवार गटाने स्थानिक नेते बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आव्हान उभे राहिले असून, इतर लोकसभा मतदारसंघाप्रमाणे भिवंडी लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोन आहेत बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे?
कोणतीही राजकीय घराणेशाही नसलेले बाल्या मामा यांनी आपल्या राजकीय जीवनाला शिवसेना पक्षातून सुरुवात केली. पक्षात विविध पदे भूषवली आणि जनमानसात एक ओळख निर्माण केली. 2007 मध्ये त्यांच्या पत्नीने कोन जिल्हा परिषद मतदार संघातून पहिली निवडणूक लढवली आणि मोठ्या मतांनी जिंकली. 2009 मध्ये खुद्द बाल्या मामा यांनी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले. मात्र, त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांनी पुन्हा 2014 मध्ये मनसे कडून भिवंडी लोकसभा निवडणुकीत उभे राहत त्यांनी लाखभर मते घेत चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. या सलग दोन पराभवाने खचत न जाता त्यांनी 2017 मध्ये कोन जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली आणि यावेळी जिंकली. याच जोरावर त्यांना 2018 मध्ये जिल्हा परिषद बांधकाम सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली आणि भिवंडी लोकसभा मतदार संघात आपली ओळख निर्माण केली.
advertisement
2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडे लोकसभा तिकीटाची मागणी केली, यावेळी यासाठी त्यांना खुद्द शरद पवारांनी मदत केली. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना शरद पवारांनी सांगूनही त्यांनी पक्षात थेट प्रवेश न केल्याने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर काही काळाने त्यांनी राष्ट्रवादी पक्षात राहून जिल्हा अध्यक्ष सारखी जबाबदारी पार पाडत अनेकांना मदत करत. स्वतःचे प्रकल्प निर्माण करून शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली, जे आजही आहेत. शिवसेना फुटल्याने त्यांनी काही काळ शिंदे गटात काम केले. मात्र, तिथे न जमल्याने त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी जॉइंट केली.
advertisement
अनेक वर्षांच्या कामाचे चीज म्हणून आज त्यांना शरद पवारांनी भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यामुळे भाजपचे कपिल पाटील यांच्यासमोर एक तुल्यबळ उमेदवार दिल्याने ही लढत रंगतदार होणार असल्याचे अनेकजण सांगत आहेत.
काय आहे भिवंडी लोकसभा मतदार संघाची पार्श्वभूमी?
भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम, शहापूर,कल्याण पश्चिम,भिवंडी ग्रामीण आणि कल्याण पश्चिम असे सहा मतदार संघ येत असून यातील भिवंडी पूर्व मधून समाजवादी पक्षाचे रईस शेख सोडले तर इतर पाचही मतदार संघात युतीचे आमदार आहेत जवळपास 35 लाख लोकसंख्या आणि तब्बल 20 लाखापेक्षा जास्त मतदार असलेल्या भिवंडी मतदार संघात,तब्बल चार लाखापेक्षा जास्त मुस्लिम मतदार असून त्या खालोखाल साडेतीन लाखा पेक्षा जास्त आगरी, कोळी, तर कुणबी मतदार हे 3 लाखाच्या आसपास असून आदिवासी अडीच लाखापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विजयाचा फॅक्टर सर्वच जाती धर्माची मते याठिकाणी असल्याचे चित्र आहे.
advertisement
काय आहेत प्रचाराचे मुद्दे?
भिवंडी लोकसभा मतदार संघात पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या अजूनही तशीच असून कपिल पाटील यांना ती सोडविण्यात हवे तसे यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. प्रचंड मोठी वाहतूक कोंडी, लोकल रेल्वेची सेवा, महिलांना विशेष लोकल फेऱ्या किंवा लोकलच्या वाढीव फेऱ्या त्याच प्रमाणे रेल्वे स्टेशनची दुरवस्था, सुसज्ज खेळाचे मैदान, मागील पाच वर्षात केंद्राच्या माध्यमातून एखादा मोठा प्रकल्प ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन बेरोजगार तरुणांना नोकरी मिळू शकेल असा एखादा प्रकल्प कपिल पाटील यांनी आणला नसल्याचे दिसून येत आहे. यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा पाटील यांचे नाव देण्यासाठी कपिल पाटील यांनी घेतलेला पुढाकार मात्र त्या हवे तसे यश मिळाले नसल्याचे दिसून येत असल्याने विरोधक हा ही मुद्दा प्रचारासाठी मोठा मुद्दा म्हणून वापरला जाणार असल्याचे बाल्या मामा यांनी सांगितले. त्यामुळे सलग दोन टर्म असलेले खासदार कपिल पाटील आणि आघाडीचे उमेदवार बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे या दोन्ही स्थानिक उमेदवारांध्ये काटेकी टक्कर होणार असल्याचे चित्र भिवंडी लोकसभा मतदार संघात दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Bhiwandi Lok Sabha : भिवंडी लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा मोठा डाव; कोण आहेत सुरेश म्हात्रे?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement