जालना हादरलं! ज्याला अंगाखांद्यावर वाढवलं त्याचाच घेतला जीव, ऐन दिवाळीत मामाने भाच्याचा केला The End

Last Updated:

Crime in Jalna : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीने ऐन दिवाळीत आपल्या भाच्याची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
भोकरदन: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एक मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीने ऐन दिवाळीत आपल्या भाच्याची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या दुसऱ्या भाच्याच्या मदतीने हा खून केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी भाच्याचा खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला नेऊन टाकला होता. पण अवघ्या दोनच तासांत पोलिसांनी आरोपींचं बिंग फोडलं आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
परमेश्वर सुभाष लोखंडे असं हत्या झालेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा येथील रहिवासी होता. तर मामा अनिल कांबळे आणि मावस भाऊ अर्जुन रामफळे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. जमिनीच्या जुन्या वादातून होणाऱ्या शिवीगाळ व भांडणाला कंटाळून मामा आणि मावस भावाने मिळून सख्ख्या भाच्याला रॉड आणि काठीने बेदम मारहाण करत त्याचा खून केला आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह क्रूझर गाडीतून नेऊन रस्त्याच्या कडेला फेकला होता.
advertisement

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परमेश्वर लोखंडे आणि त्याचा मावस भाऊ अर्जुन रामफळे यांच्यात रात्रीच्या सुमारास एका दारूच्या दुकानात जमिनीच्या कारणातून वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर अर्जुन रामफळे आणि त्याचे मामा अनिल कांबळे यांनी परमेश्वरला रॉड आणि काठीने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत परमेश्वर लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

हत्येनंतर मृतदेह फेकला

खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मामा अनिल कांबळे आणि मावस भाऊ अर्जुन रामफळे यांनी रात्रीच परमेश्वरचा मृतदेह एका क्रूझर गाडीत टाकला. त्यानंतर त्यांनी हा मृतदेह भोकरदन-जालना रोडवरील डावरगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि दोघेही पुन्हा घरी परतले.
दुसऱ्या दिवशी सकाळी काही नागरिकांना डावरगाव फाट्याजवळ हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवली आणि अवघ्या दोन तासांत खुनाचा हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. जमिनीच्या किरकोळ वादातून भाच्याचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालना हादरलं! ज्याला अंगाखांद्यावर वाढवलं त्याचाच घेतला जीव, ऐन दिवाळीत मामाने भाच्याचा केला The End
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement