50 तासांपासून संपर्क नाही, उत्तरकाशीतल्या घटनेनंतर जळगावच्या 15 पर्यटकांबाबत मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे खीरगंगा नदीपात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली. महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित आहेत, परंतु जळगावमधील 15 यात्रेकरू बेपत्ता होते. सर्व सुखरूप असल्याचे समजले.
उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे खीरगंगा नदीपात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली. त्यानंतर आलेल्या महापूर आणि दरड कोसळण्याच्या घटनेनं अख्खं गाव जमिनीखाली दबलं गेलं. 50 हून अधिक हॉटेल आणि घरंच्या घरं ढिगाऱ्याखाली गाडले गेले. काही घरांची फक्त छतं जमिनीवर दिसत होती. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. उत्तरकाशीला पर्यटनासाठी महाराष्ट्रातूनही अनेक पर्यटक गेले होते. मंजर, पुणे आणि सोलापुरातून गेलेले पर्यटक सध्या सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जळगावमधून देखील उत्तरकाशीत पर्यटनासाठी 15 जण गेले होते. त्यांच्याशी मागच्या 50 तासांपासून कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. त्याच पर्यटकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी नंतर मोठा जलप्रलय आला होता. या जलप्रलयानंतर उत्तराखंड येथे पर्यटनासाठी गेलेले धरणगाव तालुक्यातील 15 यात्रेकरू बेपत्ता झाले होते.
advertisement
तब्बल 50 तासाहून अधिकचा काळ लोटला गेल्यानंतर ही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु मुलांसोबत गेलेल्या वाहन चालकाने घरी फोन करून सर्व तरुण सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर सर्व मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सर्व तरुण गंगोत्री पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सैन्यदिलाच्या त्यामध्ये असून रस्ता सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात सर्व करून घरी परततील असे सांगितले आहे.
advertisement
दुसरीकडे पाळधी ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच मुलं सुखरूप परत यावे, यासाठी देवाला साकडे घातले होते. त्यानंतर थोड्याच वेळात सर्व मुलं सुखरूप असल्याचा निरोप आल्यानंतर पालकांच्या डोळ्यात आनंदश्रूत तरळले. आमची मुलं सुखरूप असल्याचा निरोप मिळाला असला तरी त्यांच्याशी आमचे एकदा बोलले झाल्यानंतरच आम्हाला समाधान मिळेल, अशा प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 11:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
50 तासांपासून संपर्क नाही, उत्तरकाशीतल्या घटनेनंतर जळगावच्या 15 पर्यटकांबाबत मोठी अपडेट