विमानतळावर उतरला, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी ओळखलं, बॅग चेक केली, चोरी उघडी पडली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Airport: आरोपीला अटक करत एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : अवैध पद्धतीने बँकॉकवरून तस्करी करण्यात आलेला गांजा पुणे विमानतळावर जप्त करण्यात आला. एयर इंडिया विमानाने आलेल्या अतुल सुशील हिवाळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या चेक-इन ट्रॉली बॅगमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट ला एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक IX-२४१ द्वारे बँकॉकहून पुण्यात उतरलेल्या एका प्रवासाच्या संशयित हालचालीवरून त्याची झडती करण्यात आली.
झडती दरम्यान ६११९.१५ ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक वीड (गांजा) असल्याचे अंमली पदार्थ जप्त केले. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात बेकायदेशीर किंमत ६.१२ कोटी रुपये आहे. आरोपीच्या चेक-इन ट्रॉली बॅगमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता. आरोपीला अटक करत एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर न्यायालयीन कोठडीसाठी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 06, 2025 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमानतळावर उतरला, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी ओळखलं, बॅग चेक केली, चोरी उघडी पडली