Canara Bank Recruitment 2025: लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखत होणार; 'या' उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Canara Bank Job : फायनान्स किंवा बँकेमध्ये करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा न देता थेट मुलाखत देत बँकेत निवड प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागणार आहे.
फायनान्स किंवा बँकेमध्ये करियर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा न देता थेट मुलाखत देत बँकेत निवड प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागणार आहे. कॅनरा बँकेमध्ये नोकर भरती होणार आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (Canara Bank Securities Limited)मध्ये तरूणांसाठी नोकरीच्या संधी असणार आहेत. कंपनीने सेल्स आणि मार्केटिंग विभागामध्ये, ट्रेनी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठीची अधिसूचना 8 सप्टेंबरला जाहीर करण्यात आलेली आहे.
8 सप्टेंबरपासून सेल्स आणि मार्केटिंग विभागामध्ये, ट्रेनी पदासाठीची भरती जाहीर करण्यात आली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2025 पर्यंतचा वेळ आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्जदार करू शकणार आहेत. भरतीसाठी उमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा आणि पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण असले पाहिजेत. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे आणि वय 31 ऑगस्ट 2025 पर्यंत मोजले जाणार आहेत.
advertisement
मुलाखतीबद्दलची माहिती उमेदवाराला त्याने बायोडाटामध्ये लिहिलेल्या ई- मेल आयडीवर मुलाखतीबद्दलची माहिती मिळेल. मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवाराची निवड होणार आहे. मुलाखतीला बोलवलं म्हणजे, अंतिम निवड झाली याची हमी घेऊ नये. तुमची निवड झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी आणि पात्रता तपासणी देखील करावी लागेल. मॅनेजरच्या मताप्रमाणे जर तुमची मुलाखत झाली, तरच तुमची निवड झाली असं ग्राह्य धरलं जाईल. त्यानंतर ऑफर लेटर मिळेल. निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 22000 रूपये इतका पगार मिळेल.
advertisement
जर तुमची कामगिरी प्रत्येक महिन्याला उत्तम असेल तर, तुम्हाला अतिरिक्त प्रोत्साहन पगार (Incentive) देखील मिळेल. हा 2000 रूपयांच्या आसपास असणार आहे. याचाच अर्थ उमेदवाराला मासिक वेतन 24000 रुपयांच्या आसपास मिळू शकते. सर्वप्रथम, उमेदवारांचे अर्ज तपासले जातील. त्यानंतर, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाऊ शकते. जे उमेदवार बँकेत नोकरी करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्यांना बँकिं क्षेत्राची आवड आहे, अशा उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Canara Bank Recruitment 2025: लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखत होणार; 'या' उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी