iPhone 17 भारतात लॉन्च! ॲपलच्या नव्या सीरिजची किंमत, फीचर्स आणि A टू Z माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
iPhone 17: प्रसिद्ध अमेरिकन कंपनी ॲपलने नुकतेच iPhone सीरिज भारतात लॉन्च केली. या नव्या सीरिजची किंमत, फीचर्स आणि सर्व माहिती जाणून घेऊ.
नुकतेच अमेरिकन प्रसिद्ध ब्रँड Apple ने भारतात नवी iPhone 17 सीरिज लॉन्च केली. यामध्ये iPhone 17, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max हे तीन मॉडेल्स आले आहेत. या वेळी Apple ने खास बॅटरी, कॅमेरा आणि डिझाईनमध्ये सुधारणा केली आहे. मागील iPhone 16 सीरिजपेक्षा या फोनमध्ये अधिक बॅटरी बॅकअप, जास्त चांगला कॅमेरा आणि वेगवान चिप मिळते.
advertisement
सर्वप्रथम iPhone 17 बद्दल बोलायचं झालं तर यात 6.3 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले आहे. ProMotion टेक्नॉलॉजीमुळे स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटवर चालते, त्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग खूप स्मूथ होते. Ceramic Shield 2 नावाचं नवीन प्रोटेक्शन दिलं गेलं आहे, जे तीनपट जास्त स्क्रॅच रेसिस्टंट आहे. कॅमेरामध्ये 48MP Dual Fusion सिस्टीम आहे, ज्यामुळे क्लोजअप आणि लाँग शॉट दोन्ही स्पष्ट दिसतात. पुढील बाजूला 18MP चा Center Stage फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामुळे ग्रुप सेल्फी स्मार्टपणे फ्रेम होतात.
advertisement
iPhone 17 मध्ये A19 चिप आहे जी सर्व कामं वेगाने करते. iOS 26 सोबत बरीच नवी AI फीचर्स मिळतात जसं की Live Translation आणि Image Playground. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर 3,692mAh बॅटरी दिली आहे. Apple चा दावा आहे की एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर वापरता येईल. तसेच फक्त 10 मिनिट चार्ज केलं तरी 8 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळतो.
advertisement
यानंतर iPhone 17 Pro वर नजर टाकली तर यात heat-forged aluminum unibody डिझाईन आहे, म्हणजेच फोन अधिक मजबूत आणि टिकाऊ आहे. यात Vapor Cooling तंत्रज्ञानासह A19 Pro चिप दिली आहे, जी जास्त वेगवान आणि गरम न होता काम करते. कॅमेरा सिस्टीम हा या मॉडेलचा मुख्य आकर्षण आहे. यात 48MP Fusion Triple Camera आहे आणि पहिल्यांदाच 200mm टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. यामुळे 16x ऑप्टिकल झूम मिळतो. तसेच 56 टक्के मोठा सेंसर असल्याने कमी लाईटमध्येही उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात.
advertisement
iPhone 17 Pro Max हा सर्वात मोठा आणि पॉवरफुल फोन आहे. यात iPhone 17 Pro सारखीच डिझाईन आणि कॅमेरा तंत्रज्ञान आहे, पण त्यासोबतच सर्वात मोठी 5,088mAh बॅटरी दिली आहे. त्यामुळे हा पहिला iPhone आहे ज्याची बॅटरी 5,000mAh पेक्षा जास्त आहे. ज्यांना दिवसभर भारी वापर करायचा आहे त्यांच्यासाठी हा फोन सर्वात योग्य आहे. शिवाय यात Longest Zoom कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हा खास मॉडेल ठरतो.
advertisement
iPhone 17 ची सुरुवात ₹79,900 पासून होते. iPhone 17 Pro ₹1,29,900 पासून सुरू होतो, तर सर्वात महागडा iPhone 17 Pro Max ₹1,49,900 पासून सुरू होतो. त्यामुळे साधा वापर करणाऱ्यांसाठी iPhone 17 योग्य आहे, तर कॅमेरा आणि परफॉर्मन्स प्राधान्य देणाऱ्यांसाठी iPhone 17 Pro आणि जास्त बॅटरी व कॅमेरा हवे असणाऱ्यांसाठी iPhone 17 Pro Max उत्तम ठरेल.
advertisement