PAK vs BAN सामन्यात मोठा ड्रामा, LIVE मॅचमध्ये हेल्मेट आपटलं, ग्लोव्हज फेकले, नेमका काय राडा झाला,VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानच्या एका खेळाडूने मैदानावर जोरदार हेल्मेट आपटलं आणि ग्लोव्हज देखील फेकले आहे.या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यामुळे हा राडा नेमका कसा झाला आहे? हे जाणून घेऊयात.
Pakistan vs Bangladesh Salman Agha Controversial Run out : ढाकाच्या शेरे बांगला स्टेडिअंमवर सूरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 274 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे बांगलादेशसमोर 275 धावांचे लक्ष्य आहे.या सामन्यात एक मोठा ड्रामा झाला आहे.पाकिस्तानच्या एका खेळाडूने मैदानावर जोरदार हेल्मेट आपटलं आणि ग्लोव्हज देखील फेकले आहे.या राड्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.त्यामुळे हा राडा नेमका कसा झाला आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हरला घडली होती.बांग्लादेशकडून ही ओव्हर टाकायला मेहंदी हसनला आला होता.त्याच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिझवानने फक्त बॉल प्लेस केला होता. आणि हा बॉल सलमान आघाच्या ज्या नॉनस्ट्राईक एंडवर उभा होता.त्या ठिकाणी गेला होता. सलमानकडे हा बॉल हळू येत होता. तर मेहंदी हसन हा बॉल पकडण्याचा प्रयत्नात होता.
advertisement
gotta feel for Salman Ali Agha, nothing new for Bangladeshis from timing out batsmen to this.pic.twitter.com/gK3rHCN6rC
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) March 13, 2026
या दरम्यान बॉल सलमान आगाच्या बाजूला थांबताच त्याने तो उचलून मेहंदी हसनच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात मेहंदी हसनने बॉल हातात घेऊन त्याला रनआऊट केले. खरं तर बॉल सलमानकडे थांबल्यामुळे तो मेहंदी हसनला उचलून देणार होता. पण त्याआधीच मेहंदी हसनने त्याला रनआऊट केले.खरं तर खेळभावना जपत सलमान ही कृती करत होता. पण मेहंदी हसनने अशाप्रकारे त्याला आऊट केले.
advertisement
दरम्यान मेहदी हसनने अपील करताच अंपायनरे हा निर्णय़ थर्ड अंपायरकडे सोपवला.त्यानंतर थर्ड अंपायरने सलमानला रनआऊट दिले होते.त्यामुळे या निर्णयानंतर सलमान आघा प्रचंड संतापला होता आणि त्याने हेल्मेट काढून मैदानात आपटलं होतं, त्यानंतर त्याने ग्लोव्हज काढून देखील फेकले होते.या दरम्यान सलमान आघा प्रचंड चिडला होता.त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता.
पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर मागच्या सामन्यात लाजिरवाणी हार पत्करल्यानंतर खेळाडूंनी यावेळी सावधगतीने गोलंदाजी केली. पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली होती. कारण साहिबजादा फरहानने 31 धावा तर माज सदाकतने 75 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहम्मद रिझवानने 44 आणि सलमान आघाने 64 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर पाकिस्तान 274 धावांवर ऑलआऊट झाली होती.
advertisement
बांगलादेशकडून यावेळी रिषाद होसेनने 3, मेहंदी हसनने 2, तास्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि नाहीद राणाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 6:26 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN सामन्यात मोठा ड्रामा, LIVE मॅचमध्ये हेल्मेट आपटलं, ग्लोव्हज फेकले, नेमका काय राडा झाला,VIDEO







