Health Tips: शरीराला अति घाम येतोय? हे करा उपाय, लगेच मिळतील फायदे
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
शरीरातील उष्णता कमी जास्त झाल्यास अति घाम येणे किंवा काहीच घाम न येणे हा त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी प्राणायाम करणे योग्य ठरू शकतात.
अमरावती: आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा दोन प्रकारची लोकं बघतो. त्यातीलच काही असे असतात ज्यांना फॅन सुरू असताना देखील खूप घाम येतो. तर काही असे असतात ज्यांना घामच येत नाही. सतत थंडी वाजत असते. तर याचं कारण असू शकतं आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी कमी जास्त होणे. शरीरातील उष्णता कमी जास्त झाल्यास हा त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी प्राणायाम करणे योग्य ठरू शकते. कोणकोणते प्राणायाम तुम्ही करू शकता? याबाबत माहिती योग शिक्षिका सोनाली लोखंडे यांनी दिली आहे.
अति घाम येणाऱ्यांसाठी चंद्रभेदी प्राणायाम
ज्यांना खूप घाम येतो त्यांच्याबद्दल माहिती देताना सोनाली सांगतात की, ज्यांना फॅन सुरू असताना देखील घाम येतो. त्यांच्या शरीरातील उष्णतेची पातळी वाढलेली असते. त्यामुळे त्यांना अति घाम येतो. अशावेळी तुम्ही चंद्रभेदी प्राणायाम करू शकता. चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीतून सोडणे. त्यामुळे आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह होऊन आपल्या शरीरातील उष्णता बॅलन्स होते, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
घाम न येणाऱ्यांसाठी सुर्यभेदी प्राणायाम
ज्यांना काहीच घाम येत नाही त्यांच्याबद्दल माहिती देताना सोनाली सांगतात की, काही लोक असे असतात, ज्यांना सतत थंडी वाजते. त्यांना घाम कधीच येत नाही. अशावेळी शरीरातील उष्णतेची लेव्हल कमी झालेली असते. ती बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सुर्यभेदी प्राणायाम करू शकता. यामध्ये उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
प्राणायाममुळे शरीराला शारीरिक, मानसिक फायदे
जास्त घाम येत असल्यास चंद्रभेदी आणि घाम येत नसल्यास सूर्यभेदी प्राणायाम तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेची पातळी स्थिर राहून त्रास कमी होतो. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे. त्यामुळे तो नक्की करून बघा. तसेच प्राणायाममुळे शरीराला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे होतात. पचन सुधारते, तणाव कमी होतो, मनःशांती मिळते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 10, 2025 3:10 PM IST