Vidarbha Politics : विदर्भातील महायुतीमध्ये 'अशी ही पळवापळवी', आघाडीत अखेरच्या क्षणी परस्परांचे उमेदवार पळवले
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vidarbha Local body elections : विदर्भात काही ठिकाणी काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली आहे, तर महाविकास आघाडीमधील इतर पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत.
Vidarbha Local body elections : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (local body elections) मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र विदर्भात दिसत आहे. विदर्भातील 55 नगरपालिका आणि 45 नगरपरिषदांसाठी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये सर्वच प्रमुख पक्षामध्ये फाटाफूट झाली आहे. इतकंच नाही तर, अखेरच्या क्षणी परस्परांचे उमेदवार देखील पळवल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
नागपूरात भाजप स्वबळावर
नागपूर जिल्ह्यातील 27 ठिकाणी होत असलेल्या निवडणुकीत भाजपने बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. पारशिवनी वगळता इतर सर्व ठिकाणी भाजप एकटी लढत आहे. पारशिवनीमध्ये मात्र महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा आहे. दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीतही एकी राहिलेली नाही. काँग्रेस स्वबळावर रिंगणात उतरली आहे, तर महाविकास आघाडीमधील इतर पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहेत.
advertisement
उमेदवारांची पळवापळवी
कामठीमध्ये तर वेगळेच चित्र दिसत आहे, जिथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार गट) असा थेट आणि अत्यंत चुरशीचा सामना होण्याची शक्यता आहे. विदर्भातील या स्थानिक इलेक्शन्समध्ये उमेदवारांची पळवापळवी हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. गोंदिया आणि भद्रावतीमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेले उमेदवार शिवसेना (शिंदे गटाने) पळवून त्यांच्याच चिन्हावर उभे केले आहेत. याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवार देखील शिवसेनेनं (शिंदे गट) पळविल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे काँग्रेसला मोठा सेटबॅक बसला आहे.
advertisement
वाद पक्षश्रेष्ठींकडे पोहचला
दरम्यान, भंडारा जिल्ह्यामध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष (भाजप, शिव सेना-शिंदे गट, आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकत्र न येता स्वबळावर लढत आहेत, ज्यामुळे येथेही त्रिकोणीय लढती पाहायला मिळतील. वर्ध्याच्या आर्वी इथल्या नगर पालिकेच्या निवडणूकीपूर्वीच काँग्रेस मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. काँग्रेस प्रदेशाचे पदाधिकारी शैलेश अग्रवाल व नव्यानेच काँग्रेसमध्ये आलेल्या बाळा जगताप यांच्यात एबी फॉर्म पळविल्याच्या आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच जुंपलीय. यांचा वाद पक्षश्रेष्ठींकडे पोहचला असून पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Nov 18, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vidarbha Politics : विदर्भातील महायुतीमध्ये 'अशी ही पळवापळवी', आघाडीत अखेरच्या क्षणी परस्परांचे उमेदवार पळवले










