महाराष्ट्राच्या तिजोरीतील पैसा तुमच्या बापजाद्यांनी कमावलाय का? वडेट्टीवार दोन्ही दादांवर संतापले

Last Updated:

Maharashtra Local Body Election: निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, असा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करून निवडणूक आयोग कारवाई का करत नाही? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि विजय वडेट्टीवार
चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि विजय वडेट्टीवार
नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत, अशी सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
मत दिलं तर योजनांना निधी देईल, मतदान केले नाही तर निधी कात्री लावेन, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असतील पण तिजोरीचा मालक आपला आहे, असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर कुरघोडी म्हणून अर्थमंत्री आपलेच आणि चाव्याही आपल्याच हातात, असे विधान रुपाली चाकणकर यांनी केले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी याच नेत्यांच्या बेताल विधानाचा समाचार घेतला.
advertisement

महाराष्ट्राच्या तिजोरीतील पैसा तुमच्या बापजाद्यांनी कमावलाय का?

मते दिली नाही तर निधी देणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी ही सत्ताधाऱ्यांची खासगी संपत्ती आहे का? यांच्या बापजाद्यांनी कमावलेली तिजोरी आहे का? सत्ताधारी जनतेला धमकावत आहे, गुंडगिरीचा भाषा वापरत असताना निवडणुका आयोगाला दिसत नाही का? अशा वक्तव्याची दखल निवडणूक आयोग घेऊन कारवाई का करत नाही असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
advertisement

निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे

ऐन निवडणुकीत निधीची भाषा करणे म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे. सत्ताधारी मतदारांना गृहित धरत आहे निवडणूक आयोगाने याबाबत कारवाई केली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत

एकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला आहे दुसरीकडे सरकारने कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी मंजूर केले आहे. शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याची वेळ आली की पैसे नसतात पण कुंभमेळ्यासाठी इतका खर्च केला जातो? यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते! कुंभमेळ्यासाठी झाड तोडली जाणार आहे,कुंभमेळा महत्वाचा की बळीराजा? शेतकऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली पाहिजे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राच्या तिजोरीतील पैसा तुमच्या बापजाद्यांनी कमावलाय का? वडेट्टीवार दोन्ही दादांवर संतापले
Next Article
advertisement
ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement