काय स्मरणशक्ती, काय फिटनेस, सर्व ओक्केमध्ये; नव्वदीच्या आजोबांचे छंद पाहून तरुणही चाट

Last Updated:

आजोबांकडे बघून ते तब्बल 90 वर्षांचे आहेत असं कोणीही म्हणणार नाही. उमेद आणि ऊर्जा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का..

+
काय

काय स्मरणशक्ती, काय फिटनेस, सर्व ओक्केमध्ये; नव्वदीच्या आजोबांचे छंद पाहून तरुणही चाट

वर्धा, 14 ऑगस्ट: आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या नव्वदीपार आजोबांना पाहून असं कधी वाटलंय का की, वय फक्त आकडा आहे. हा माणूस या वयात काहीही करू शकतो. अशा ऊर्जावान आजोबांपासून अनेकांना प्रेरणा मिळत असते. वर्धा येथे असेच एक 90 वर्षांचे आजोबा आहेत. त्यांची स्मृती या वयातही तेज असून त्यांनी शालेय वयात लागलेला वाचनाचा, कविता लिहण्याचा छंद या वयातही जोपासला आहे. विशेष म्हणजे प्रभाकर गुलाबरावजी उघडे यांनी अनेक कवितांचा संग्रह केलाय. ते स्कूटर ज्या सहजतेने चालवतात तितक्याच सहजतेने वर्ध्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये वावरत असतात. या आजोबांची नव्वदीतील ऊर्जा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं.
डबल सीट चालवतात दुचाकी
आजोबांकडे बघून ते तब्बल 90 वर्षांचे आहेत असं कोणीही म्हणणार नाही. या वयातही ते त्यांच्या नातवाला डबल सीट घेऊन गाडी चालवतात. मी ट्राफिक मधूनही चांगली गाडी चालवू शकतो असे त्यांनी सांगितले. नित्यनियमाने ते रोज वर्तमानपत्र वाचतात. त्यांच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या अनेक कवितांच्या कात्रणांचा संग्रह त्यांनी जपून ठेवलाय. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचेही फोटोज सुद्धा त्यांनी जपून ठेवलेत.
advertisement
माझी ऊर्जा म्हणजे देवाची देण
आजोबांचा मुलगा दुर्दैवाने या जगात नाही. त्यामुळे आजोबांच्या घरी त्यांच्या सुनबाई आणि एक नातू आहे. 90 वर्षांच्या वयातही आजोबा घरही सांभाळू शकत आहेत. आजोबा याही वयात अनेक काम करतात, चालतात, फिरतात. तरीही तब्येतीच्या फारशा तक्रारी नाहीत. अनेक कार्यक्रमांसाठी तयारी दर्शवतात. सहभागी होतात. कविता लिहायला सुद्धा सुचतात. लेखनाची आणि वाचनाची आवड त्यांनी जोपासलीय. त्यामुळे त्यांची या वयातील ही ऊर्जा म्हणजे देवाने दिलेली देण असल्याचं ते सांगतात.
advertisement
आजोबांची स्मरणशक्ती बघून वर्धेकर थक्क
विशेष काही मेहनत न घेता या वयातील आजोबांची फिटनेस आणि स्मरणशक्ती बघून वर्धेकर थक्क होतात. आजकालच्या तरुण पिढीला मैदानी खेळ हे मैदानात नाही तर मोबाईलवर खेळण्याची सवय आहे. त्यामुळे मोबाईल पासून दूर राहत मैदानात खेळ खेळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. आजोबांचे शिक्षण अकरावीपर्यंत एक वर्ष त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर बांधकाम विभाग आणि खाजगी कंपन्यांमध्ये देखील दीर्घकाळ काम केला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आधारवड संस्थेचे ते सभासद आहेत आणि आनंदी कट्ट्याचे हे सदस्य आहेत. तब्बल 90 वर्षांच्या वयातही तब्येत ठणठणीत तसेच वाचन, लेखन, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात हे आजोबा मोठ्या उमेदीने उत्साहाने सहभाग घेतात, ही मात्र कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
काय स्मरणशक्ती, काय फिटनेस, सर्व ओक्केमध्ये; नव्वदीच्या आजोबांचे छंद पाहून तरुणही चाट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement