महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर भारतातील दाट धुक्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान घसरणार आहे. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
डिसेंबर महिना संपायला फक्त दोन दिवस शिल्लक असून नव्या वर्षात कडाक्याची थंडी आणि धुकं राहणार आहे. उत्तर भारतात सध्या अतिशय दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसत आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी दोन दिवस राज्याच्या तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची दाट शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या काही भागांत हुडहुडी वाढणार आहे. विदर्भाच्या सिमेवरील भागांमध्ये हाडं गोठवणारी थंडी वाढणार आहे.
advertisement
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे सध्या थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याचा थेट परिणाम लगतच्या विदर्भावर होत आहे. नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पारा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निवळल्यानंतर थंडीचा कडाका आणखी तीव्र होईल. दुसरीकडे मुंबई, उपनगर, आणि नवी मुंबईतही गारठा मागच्या 48 तासांत वाढला आहे. त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.
advertisement
परभणी, निफाड, अहिल्यानगर, धुळे या भागांमध्ये आधीच हवामान खाली घसरलं आहे. त्यात पुढचे दोन दिवस तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे. ला निनाचा इफेक्ट असल्याने या वेळी थंडी जास्त राहणार आहे. जानेवारीतला पहिला आठवडा गारठ अनुभवायला मिळणार आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमान 8 ते 5 अंशांवर आलं आहे. हाडं गोठवणाऱ्या बोचऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवली जात आहे.
advertisement
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात सध्या दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आली आहे. दिल्लीच्या पालम आणि सफदरजंग स्टेशन्सवरही दाट धुक्याची नोंद झाली आहे. ३० डिसेंबरनंतर एक नवीन Western Disturbance हिमालयाला धडकणार आहे, ज्यामुळे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला थंडीची लाट अधिक तीव्र होईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.
advertisement
दाट धुक्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या आणि विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच, नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या पर्यटकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने थंडी आणि धुक्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आणि लहान मुलांनी पहाटेच्या गारठ्यात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 7:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रावर नव्या वर्षात मोठं संकट, 5 दिवस हवामानात मोठे बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट







