मुंबईत बेस्ट बसने 13 जणांना उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्टेशन बस डेपोजवळ सोमवारी रात्री मोठा अपघात झाला. बेस्ट इलेक्ट्रिक बस क्रमांक ६०६ ने १३ जणांना उडवलं आहे.
मुंबईतील भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्टेशन बस डेपोजवळ सोमवारी रात्री मोठा अपघात झाला. बेस्ट इलेक्ट्रिक बस क्रमांक ६०६ ने १३ जणांना उडवलं आहे. या अपघातात चार जणांचा चिरडून मृत्यू झाला आहे. तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका पुरूषाचा समावेश आहे. या अपघातात ८ पुरुष आणि एका महिलेसह नऊ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मुंबईच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास लोक कामावरून घरी परतत असताना हा अपघात झाला. भांडुप स्टेशनच्या बाहेर, फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांची बाजारपेठ असलेली मोठी गर्दी होती. स्टेशनजवळ अचानक बेस्ट इलेक्ट्रिक बस वळत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि सुमारे १३ जणांना धडकली. काही जण बसखाली चिरडले गेले, ज्यामुळे जागीच चार जणांचा मृत्यू झाला.बसच्या धडकेने लोखंडी विजेचा खांबही वाकला आहे. यावरून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो.
advertisement
पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी हेमराज राजपूत यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, चालक दारू पिऊन नव्हता. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला? हे शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब गोळा करत आहोत.
advertisement
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
प्रत्यक्षदर्शी साई मुनी मुदलियार यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी स्टेशनबाहेर मोठी गर्दी होती. वळण घेताना बस अचानक नियंत्रण गमावून बसने अनेक लोकांना धडक दिली. सध्या पोलीस तपास सुरू आहे. बस चालक नवीन होता की अनुभवी? बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? या सर्व बाबींची चौकशी केल्यानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल.
advertisement
मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2025
advertisement
मृताच्या नातेवाईकांना ५ लाख
या अपघातानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरं वाटावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, अशी घोषणानाही फडणवीसांनी केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 6:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईत बेस्ट बसने 13 जणांना उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार









