फक्त दोन दिवस बाकी! ३१ मार्चच्या आधी 'हे' कामं करून घ्या, अन्यथा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
New Rules : १ एप्रिलपासून विविध आर्थिक आणि करसंबंधित नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यांवर, गुंतवणुकीवर आणि टॅक्स सवलतींवर होणार आहे.
मुंबई : ३१ मार्च २०२६ ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अंतिम तारीख ठरणार आहे. कारण १ एप्रिलपासून विविध आर्थिक आणि करसंबंधित नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या बँक खात्यांवर, गुंतवणुकीवर आणि टॅक्स सवलतींवर होणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता काही महत्त्वाची आर्थिक कामे या तारखेपूर्वी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा काही खात्ये निष्क्रिय होऊ शकतात किंवा कर सवलतींचा लाभही मिळणार नाही.
१ एप्रिलपासून बदलणार नियम
नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस आणि आयकर नियमांमध्ये बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी आवश्यक व्यवहार पूर्ण केल्यास खाते सक्रिय राहील, कर बचत होईल आणि दंड टाळता येईल. विशेषतः ज्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंकिंग झालेले नाही किंवा ज्यांच्यावर कर्ज आहे, त्यांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
advertisement
पीएफ आणि सुकन्या समृद्धी खाते सक्रिय ठेवा
प्रॉविडंट फंड (PF) खात्यात किमान ५०० रुपये आणि सुकन्या समृद्धी योजना खात्यात किमान २५० रुपये जमा करणे बंधनकारक आहे. हे व्यवहार ३१ मार्चपूर्वी पूर्ण न केल्यास खाते निष्क्रिय होऊ शकते. विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी असलेली ही योजना सुरू ठेवण्यासाठी वेळेत रक्कम जमा करणे आवश्यक आहे.
advertisement
एनपीएसमध्ये गुंतवणूक करा
National Pension System (NPS) अंतर्गत टियर-१ खाते सक्रिय ठेवण्यासाठी किमान १,००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. यामुळे आयकर कायद्याच्या कलम 80CCD(1B) अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कर सवलत मिळू शकते. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ही गुंतवणूक केल्यास दुहेरी फायदा मिळतो.
पॅन-आधार लिंकिंग आणि KYC पूर्ण करा
पॅन कार्डला आधारशी लिंक करणे आता अत्यावश्यक झाले आहे. अनेक बँकिंग, शेअर बाजार आणि कर व्यवहारांसाठी हे बंधनकारक आहे. तसेच प्रलंबित KYC प्रक्रिया आणि मागील वर्षाचे सुधारित आयकर विवरणपत्र (ITR) देखील ३१ मार्चपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा व्यवहार अडकण्याची शक्यता आहे.
advertisement
80C अंतर्गत कर बचत गुंतवणूक
जुनी करप्रणाली (Old Regime) निवडणाऱ्यांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. यासाठी एलआयसी पॉलिसी, ईएलएसएस म्युच्युअल फंड, ५ वर्षांची फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुलांच्या शाळेची फी यामध्ये गुंतवणूक करता येते. ३१ मार्चनंतर या आर्थिक वर्षासाठी ही सवलत लागू होणार नाही.
होम लोनवर सवलत मिळवा
advertisement
घरकर्ज घेतलेल्या व्यक्तींनी ३१ मार्चपूर्वी मुद्दल रक्कम भरल्यास आयकर कलम 80C अंतर्गत सवलत मिळू शकते. याशिवाय व्याजावरही वेगळी कर सवलत मिळते. त्यामुळे बँकेत संपर्क साधून हप्ते वेळेवर भरणे फायद्याचे ठरते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फक्त दोन दिवस बाकी! ३१ मार्चच्या आधी 'हे' कामं करून घ्या, अन्यथा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही







