advertisement

2 वर्षाच्या चिमुकल्याचा ‘श्वास’ अडकला, रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला अन्...

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: ऑक्सिजनची पातळी धोकादायकरीत्या 20 टक्क्यांपर्यंत खाली आली होती, त्यामुळे त्याला सलग सहा तास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.

2 वर्षाच्या चिमुकल्याचा ‘श्वास’ अडकला, रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का, शेवटी डॉक्टरांनीच निर्णय घेतला
2 वर्षाच्या चिमुकल्याचा ‘श्वास’ अडकला, रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का, शेवटी डॉक्टरांनीच निर्णय घेतला
छत्रपती संभाजीनगर: तब्बल सहा तास मृत्यूशी झुंज देत व्हेंटिलेटरवर असलेल्या बालकाचा डॉक्टरांनी जीव वाचवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन वर्षांच्या आरव (नाव काल्पनिक आहे) याच्यावर अत्यंत गुंतागुतीची शस्त्रक्रिया झाली. त्याच्या श्वसननलिकेत (ब्रॉन्कस) अडकलेला सिमेंटचा खडा डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला आणि त्याचे प्राण वाचवले.
छत्रपती संभाजीनगरातील चिमुकल्या आरवला अचानक श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री तातडीने त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत मुलाच्या श्वसननलिकेत सिमेंटचा खडा अडकलेला असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. ऑक्सिजनची पातळी धोकादायकरीत्या 20 टक्क्यांपर्यंत खाली आली होती, त्यामुळे त्याला सलग सहा तास व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले.
advertisement
या गंभीर अवस्थेत डॉक्टरांनी विलंब न करता शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही जटिल प्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेदरम्यान श्वसननलिकेत अडकलेला सिमेंटचा खडा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. खडा काढल्यानंतर आरवचा श्वास सुरळीत झाला आणि त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. सध्या त्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर ‘पीआयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत.
advertisement
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. सुचिता जोशी, डॉ. किरण चव्हाण, डॉ. नितीन इनवोके, डॉ. अदिती उखळे, डॉ. प्रशांत, डॉ. कल्याणी उगले, डॉ. उत्कर्ष शाह, डॉ. ऋषिकेश खेरडे, डॉ. ऋतुजा थोरात, आशय केदारी आणि योगेश लाहोटे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
2 वर्षाच्या चिमुकल्याचा ‘श्वास’ अडकला, रिपोर्ट पाहून सगळ्यांनाच धक्का, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला अन्...
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement