advertisement

EV Rules : लक्ष द्या! ई-वाहनांची मनमानी संपणार; परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

EV Rules : राज्यात ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी परवाना अनिवार्य करण्याचा निर्णय प्रस्तावित आहे. या नियमामुळे अवैध वाहतूक कमी होईल, प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि वाहतूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता व शिस्त येईल.

News18
News18
ठाणे : राज्यात अलीकडे प्रवासी वाहतुकीत मोठे बदल होत असून त्यातच आता ई-रिक्षा तसेच ई-बाइक्ससाठी नवीन नियम लागू होणार आहेत. आतापर्यंत अनेक ई-वाहने विनापरवाना रस्त्यावर धावत होती. मात्र आता परिवहन विभागाने यावर कडक भूमिका घेतली आहे. लवकरच सर्व ई-रिक्षा आणि ई-बाइक चालकांना अधिकृत परवाना घेणे अत्यावश्यक होणार आहे.
परिवहन विभागाचा मास्टरप्लॅन
राज्यात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र आता परवान्याबाबत स्पष्ट नियम नसल्याने अनेक अडचणी आणि वाद निर्माण होत होते. हे टाळण्यासाठी आता सर्व ई-वाहनांना नियमांच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता नव्या नियमांनुसार प्रत्येक चालकाकडे वैध परवाना असणे आवश्यक असणार असून त्याच्याकडे वाहनांची अधिकृत नोंदणी केली जाईल. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण मिळवता येईल.
advertisement
सर्व कागदपत्रांसाठी एकाच ठिकाणी सिंगल विंडो सेवा
वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभाग सिंगल विंडो प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीमुळे सर्व कागदपत्रांची प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येईल आणि परवाना मिळवणे सोपे होईल. आता ई-वाहन चालकांनाही सीएनजी रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणेच कर, विमा आणि इतर नियमांचे पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
EV Rules : लक्ष द्या! ई-वाहनांची मनमानी संपणार; परिवहन विभागाने घेतला मोठा निर्णय
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement