दूध का घेतलं नाही? नवरा भडकला अन् बायकोनं मांडीतच चाकू खुपसला, बुलडाण्यातील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
सोमवारी सकाळी मंगेश गवळी यांचं आपल्या पत्नीसोबत दूध घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रूपांतर
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलडाणा : नवरा बायकोमध्ये या ना त्या कारणावरून भांडण ही काही नवी गोष्ट नाही. प्रत्येक घरामध्ये हा प्रकार सर्रास घडत असतो. पण, अशातच बुलडाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दूध घेण्यावर नवरा आणि बायकोमध्ये वाद झाला. या वादातून बायकोनं नवऱ्याच्या मांडीत चाकू खुपसल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील सर्वेश्वर नगर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश आनंदा गवळी (वय ३० ) असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आाहे. मंगेश गवळी हे बोरखेड इथं सर्वेश्वर नगरमधील वार्ड नंबर १५ मोताळा इथं आपल्या पत्नीसोबत वास्तव्यास आहे.
advertisement
मंगेश गवळी हे व्यवसायाने फोटोग्राफर आहे. सोमवारी सकाळी मंगेश गवळी यांचं आपल्या पत्नीसोबत दूध घेण्यावरून शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रूपांतर टोकाच्या संतापात झाले आणि रागाच्या भरात आरोपी पत्नी प्रिया मंगेश गवळी (वय २१ वर्षे) हिने घरातील चाकू उचलून थेट मंगेशच्या उजव्या मांडीत खुपसला.
या हल्ल्यात मंगेश हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. एवढ्यावरच न थांबता आरोपी प्रियाने त्याला अश्लील शिवीगाळ करत तुला जिवानेच मारून टाकते, अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत मंगेश गवळी याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आहे. या प्रकरणी मंगेश गवळी याने बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रिया गवळी हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८, ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Buldana,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दूध का घेतलं नाही? नवरा भडकला अन् बायकोनं मांडीतच चाकू खुपसला, बुलडाण्यातील घटना








