Wardha: रूममध्ये घुसला अन् गळा दाबून तिला संपवलं; मोबाइल घेऊन तरुण पळाला, वर्ध्यातील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
वर्धा शहरातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विद्यार्थिनीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीची तिच्याच मित्राने रूममध्ये घुसून गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून तरुण हाा मोबाइल घेऊन पळून गेला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा शहरातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विद्यार्थिनीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. ही तरुणी बीसीएच्या प्रथम वर्षाला शिकत होती. मित्राने या तरुणीच्या रूमवर येऊन गळा दाबून तिची हत्या केली. तरुणीची हत्या केल्यानंतर या तरुणाने तिचा मोबाईल घेऊन पळ काढला होता.
advertisement
शेजाऱ्यांनी ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात वर्धा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला असून तरुणीची मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हत्या करणारा तरुण आणि मृत तरुणी हे दोघेही एकाच गावातील रहिवाली आहे. दोघेही एकमेकांना ओळखत होते. मृत विद्यार्थिनीने लग्नासाठी तगादा लावल्यानं मुलाने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षकासह वर्धा पोलिसांचा ताफा रात्री उशिरापर्यंत हजर होता. या तरुणाने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप कळू शकलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
November 05, 2025 10:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha: रूममध्ये घुसला अन् गळा दाबून तिला संपवलं; मोबाइल घेऊन तरुण पळाला, वर्ध्यातील घटना


