तुमच्या कुटुंबाला द्या आर्थिक सुरक्षा कवच, 5 सरकारी योजना ज्या प्रत्येकाला माहिती हव्यात

Last Updated:

BPL कुटुंबांसाठी केंद्र सरकारच्या Indira Gandhi राष्ट्रीय पेन्शन, राष्ट्रीय पारिवारिक लाभ व अन्नपूर्णा योजना आर्थिक मदत व मोफत धान्य देतात अर्ज UMANG Appवर करता येतो.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated Image)
देशभरात सरकारच्या अनेक योजना सध्या आहेत मात्र त्या आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतात तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा कवच द्यायचे असेल तर या काही योजना आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात. देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी केंद्र सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. वृद्ध व्यक्ती, विधवा महिला, दिव्यांग नागरिक तसेच कुटुंबातील प्रमुख कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबांचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या योजना BPL असलेल्या कुटुंबांसाठी आहेत आणि मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना
वृद्धांना आधार देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेखाली 60 वर्षांवरील नागरिकांना दरमहा पेन्शन मिळते. 60 ते 79 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 200 रुपयांची मदत केंद्र सरकार देते, तर 80 वर्षांनंतर त्याच रकमेचे मूल्य वाढून 500 रुपये होते. महत्त्वाचे म्हणजे, योजनेचा लाभ घेण्यासाठी वय सिद्ध करणारी कागदपत्रे आणि BPL कुटुंबाशी संबंधित पुरावे आवश्यक आहेत. काही राज्य सरकारे अतिरिक्त रक्कम देतात, त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारा हप्ता वाढतो.
advertisement
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देते. 40 ते 79 वर्षे वय असलेल्या विधवांना दरमहा 300 रुपये मिळतात, तर 80 वर्षांनंतर ही मदत 500 रुपयांपर्यंत जाते. सोबतच, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना दिव्यांग व्यक्तींना दिली जाते. 18 ते 79 वर्षे वयोगटात असलेल्या गंभीर किंवा बहुविकलांग व्यक्तींना दरमहा 300 रुपयांची मदत मिळते, आणि 80 वर्षांनंतर ही मदत 500 रुपये होते. या दोन्ही योजनांसाठी दिव्यांगतेचा प्रमाणपत्र आणि BPL श्रेणीतील नोंद अनिवार्य आहे.
advertisement
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग पेंशन योजना
ही योजना १८ ते ७९ वयोगटातील गंभीर किंवा अनेक अपंगत्व असलेल्या लोकांसाठी आहे. पात्र अपंग व्यक्तींना दरमहा ३०० रुपये पेन्शन मिळते. ८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना दरमहा ५०० रुपे पेन्शन मिळते. या योजनेचा लाभ घेणारी व्यक्तकी ही दारिद्र्यरेषेखाली असणं आवश्यक आहे.
राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना
कुटुंबातील मुख्य कमावता सदस्य अचानक गमावल्यास, त्याचा मोठा धक्का आर्थिकदृष्ट्याही जाणवतो. अशा संकटात मदतीचा हात म्हणून राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना उपलब्ध आहे. या योजनेनुसार 18 ते 59 वयोगटातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला एकदाच 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा उद्देश, अचानक बदललेल्या परिस्थितीत कुटुंबाला किमान हक्काची आर्थिक सुरक्षा मिळावी, इतकाच आहे.
advertisement
अन्नपूर्णा योजना
ही योजना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे जे IGNOAPS साठी पात्र आहेत, काही कारणास्तव त्यांना त्यांचे पेन्शन मिळत नाही. सरकार अशा व्यक्तींना दरमहा १० किलो मोफत धान्य देते. पात्र होण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकाचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आणि दारिद्र्यरेषेखाली जगणे आणि पेन्शन न मिळणे आवश्यक आहे.
कुठे करायचा अर्ज
इच्छुकांनी UMANG App किंवा सरकारी वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो किंवा जवळच्या ग्रामपंचायत, नगर पालिका किंवा ब्लॉक कार्यालयात जाऊन फॉर्म भरता येतो. तुम्ही तुमच्या घरबसल्या अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी, उमंग अ‍ॅप डाउनलोड करा किंवा वेबसाइट https://web.umang.gov.in ला भेट द्या. तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा. सर्च बारमध्ये NSAP टाइप करा. ऑनलाइन अर्ज करा त्यानंतर वर क्लिक करा. तुमची माहिती भरा, बँकेची माहिती, फोटो अपलोड करा आणि सबमिट करा वर क्लिक करा. ऑफलाइन अर्जांसाठी, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय, नगरपालिका किंवा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस (BDO) ला भेट देऊन फॉर्म भरू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमच्या कुटुंबाला द्या आर्थिक सुरक्षा कवच, 5 सरकारी योजना ज्या प्रत्येकाला माहिती हव्यात
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement