आठवीत असताना आई-वडिलांचं निधन, 50 रुपयांसाठी 12 तास काम, आता महिन्याची कमाई 2 लाख!

Last Updated:

Business Success: आठवीत असताना आई-वडिलांचं निधन झालं आणि फाटक्या कपड्यांसह भानुदास मोरे यांना नाशिक गाठावं लागलं. आता स्वत:च्या व्यवसायातून ते महिन्याला 2 लाखांवर कमाई करत आहेत.

+
आठवीत

आठवीत असताना आई-वडिलांचं निधन, 50 रुपयांसाठी 12 तास काम, आता महिन्याची कमाई 2 लाख!

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर कितीही मोठ्या संकटांचा सामना करत मोठं यश मिळवता येतं. नाशिकमधील भानुदास मोरे या आठवी नापास तरुणानं हेच सिद्ध करून दाखवलं आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर फाटक्या कपड्यांसह नाशिकमध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या तरुणाची आताची कमाई लाखोंच्या घरात आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला 50 रुपयांसाठी 12 तास काम करणाऱ्या भानुदास यांनी काही लोकांना रोजगार देखील दिला आहे. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
भानुदास मोरे हे आठवीत असतानाच त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळे लहान वयातच घरची जबाबदारी अंगावर आली. लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी भानुदास हे अंगावरच्या फाटक्या कपड्यांसह नोकरीच्या शोधात गाव सोडून नाशिकला आले. नाशिकमध्ये आल्यावर आठवी नापास मुलाला नोकरी मिळत नव्हती. परंतु, भावंडांची जबाबदारी आणि त्यांचं शिक्षण यासाठी नोकरी सोडून हमालीचं काम सुरू केलं.
advertisement
हमालीचं काम करत असतानाच भानुदास कामासाठी दिल्लीला गेले. तिकडे त्यांनी मटका कुल्फी बनवण्याचं काम पाहिलं आणि ते शिकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काही दिवस दिल्लीतच काढले. तेव्हा 12 तास काम केल्यावर 50 रुपये रोजगार मिळत होता. परंतु, काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी गमवावं लागणार ही भावना तेव्हा होती. त्यामुळे खूप कष्ट केलं आणि कुल्फी बनवायला शिकलो, असं भानुदास सांगतात.
advertisement
 सुरू केला कुल्फी व्यवसाय
भानुदास यांनी 2009 मध्ये दिल्ली सोडून पुन्हा नाशिक गाठलं. नाशकिमध्ये जत्रा हॉटेल जवळ रस्त्याच्या बाजूला ईशान मटका कुल्फी नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय नवीन असल्याने कष्ट अधिक होतं. पहाटे 5 वाजलेपासूनच तयारी करावी लागत होते. तर दुपारी दुकान लावत होतो. सुरुवातीला 10 लिटर दुधापासून सुरुवात केली. परंतु, उत्तम चवीमुळे ग्राहकांची मागणी वाढत गेल्याचे भानुदास सांगतात.
advertisement
लाखोंची कमाई
आता रोज 400 लिटर दुधाची कुल्फी बनवत आहे. या कुल्फीची 2 आउटलेटमधून विक्री केली जाते. गंगापूर रोड येथे दुसरे दुकान सुरू केले आहे. दोन्ही दुकानांतून दर महिन्याला 2 ते अडीच लाख रुपये मिळतात. तसेच यासाठी 6-7 जणांना रोजगार देखील दिला आहे. आता कुल्फीला मागणी वाढली असून फ्रँचाईजी देण्याचा देखील विचार असल्याचं भानुदास सांगतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
आठवीत असताना आई-वडिलांचं निधन, 50 रुपयांसाठी 12 तास काम, आता महिन्याची कमाई 2 लाख!
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement