Gold Limit Rule: लग्न झालेल्या महिला 'इतकं' सोनं ठेवू शकतात, पण न झालेल्यांसाठी नियम वेगळा! लगेच तपासा

Last Updated:

विवाहित महिला ५०० ग्रॅम, अविवाहित महिला २५० ग्रॅम, पुरुष १०० ग्रॅम सोनं ठेवू शकतात. मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणि योग्य कागदपत्र नसल्यास आयकर विभाग नोटीस देऊ शकतो.

News18
News18
लग्नसराईचे दिवस आहेत, या काळात सोनं खरेदी केली जाते, सोनं हे आजही स्त्रीचं स्त्रीधन मानलं जातं. मात्र हे स्त्रीधन किती ठेवायचं याचेही काही नियम आहेत. त्यापेक्षा जास्त सोनं जर पत्नीकडे, नववधूकडे किंवा घरात सापडलं तर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. इतकंच नाही तर लग्नात गिफ्ट दिलेल्या वस्तूंवरही टॅक्स लागतो त्याचेही नियम प्रत्येक वधू आणि वराला माहिती असायला हवेत.
सोनं खरेदीची जुनी परंपरा
सण-समारंभाच्या काळात सोनं खरेदी करण्याची किंवा त्यात गुंतवणूक करण्याची आपली जुनी परंपरा आहे. सोनं विकत घेताना किंवा घरात ठेवताना अनेक प्रश्न मनात येतात, जसं की, घरात किती सोनं कायदेशीररित्या ठेवता येतं? मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल तर दंड लागतो का? आणि त्यावर टॅक्स कधी द्यायचा? खरं तर, असा कोणताही विशिष्ट कायदा नाही जो तुम्ही घरात किती सोनं ठेवावं हे थेट ठरवतो. तुमच्याजवळ असलेल्या सोन्याचा स्रोत कायदेशीर आहे, हे तुम्ही सिद्ध करू शकले पाहिजे
advertisement
लग्न झालेल्या आणि न झालेल्या स्त्रीकडे किती सोनं ठेवता येतं?
ही मर्यादा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने निश्चित केली आहे, जेणेकरून वैध आणि अवैध सोन्यात फरक करता यावा. आयकर विभागाच्या माहितीनुसार, जर सोनं तुमच्या डिक्लेअर इनकन टॅक्समधून खरेदी केलं असेल किंवा तुम्हाला कुटुंबाकडून वारसा म्हणून मिळाले असेल आणि ते खालील मर्यादेत असेल, तर त्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही. विवाहित महिला ५०० ग्रॅमपर्यंत सोनं ठेवता येतं. तर अविवाहित महिला २५० ग्रॅम सोनं ठेवता येतं. विवाहित असो किंवा नसो पण पुरुषांकडे मात्र 100 ग्रॅम सोनं ठेवता येतं. यापेक्षा जास्त सोनं ठेवल्यास नोटीस येऊ शकते.
advertisement
सोन्याच्या वस्तूसोबत बिलही आवश्यक
जोपर्यंत तुमचे सोनं या दिलेल्या मर्यादेत आहे, तोपर्यंत त्याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही. सोनं हे दागिने, नाणी किंवा सोन्याचा बार अशा कोणत्याही स्वरूपात घरात ठेवता येते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेवढंही सोनं घेतलं आहे त्याची बिलं तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत. जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सोनं कोणत्याही योग्य कागदपत्रांशिवाय ठेवलं, तर त्याला लपवलेले उत्पन्न मानले जाते. अशा परिस्थितीत, आयकर तपासणीदरम्यान हे सोनं जप्त केले जाऊ शकतं आणि त्यावर दंड देखील लागू होऊ शकतं.
advertisement
डिजिटल गोल्डवर टॅक्स लागतो का?
घरात ठेवलेल्या सोन्यावर फक्त खरेदीच्या वेळी ३% जीएसटी लागतो आणि विक्रीच्या वेळी 'कॅपिटल गेन टॅक्स' लागू होतो. जर तुम्ही सोनं खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत विकले, तर शॉर्ट-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तीन वर्षांनंतर विकल्यास, लॉन्ग-टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. याव्यतिरिक्त, सोन्यात गुंतवणूक करण्याचे इतर पर्यायही आहेत, जसे की सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आणि डिजिटल गोल्ड. SGB मध्ये एका वर्षात ४ किलोपर्यंत गुंतवणूक करता येते, तर डिजिटल गोल्ड खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही. मात्र, या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर त्यांच्या नियमांनुसार टॅक्स लागू होतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Limit Rule: लग्न झालेल्या महिला 'इतकं' सोनं ठेवू शकतात, पण न झालेल्यांसाठी नियम वेगळा! लगेच तपासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement