Gold Price News : एका झटक्यात चांदी ८,८७५ रुपयांनी महागली! दोन लाखांचा टप्पा पार, सोन्याचा प्रति तोळा दर किती?

Last Updated:

Gold Silver Price : आज सोनं-चांदीच्या दरात चांगलीच तेजी आली. त्यामुळे सोनं-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, सामान्यांना सोनं खरेदीसाठी खिशावरचा भार सहन करावा लागणार आहे.

News18
News18
Gold Price : मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात जबरदस्त तेजी आली होती. मंगळवारी या तेजीला ब्रेक लागल्याचे दिसून आले होते. सोन्याचा दर आणखी कमी होईल अशी अपेक्षा असताना मात्र, आज सोनं-चांदीच्या दरात चांगलीच तेजी आली. त्यामुळे सोनं-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर, सामान्यांना सोनं खरेदीसाठी खिशावरचा भार सहन करावा लागणार आहे.
आज सराफा बाजारात चांदीने २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या किमती एकाच झटक्यात ८७७५ रुपयांनी वाढल्या आणि जीएसटीशिवाय २,००,७५० रुपये प्रति किलोवर उघडल्या. जीएसटीसह चांदी २,०६,७७२ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आता ९३६ रुपयांनी वाढून १,३२,७१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. जीएसटीसह तो आता १,३६,६९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे.
advertisement
मंगळवारी, चांदी जीएसटीशिवाय १,९१,९७५ रुपये प्रति किलोवर बंद झाली. सोने जीएसटीशिवाय १३१७७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाले. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ५६९७३ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीत ११४७३३ रुपयांची वाढ झाली आहे.

चांदी तीन लाखांचा टप्पा गाठणार?

व्हेंचुराचे कमोडिटी आणि सीआरएम प्रमुख एन.एस. रामास्वामी यांनी सांगितले की, चांदीच्या पुरवठ्यातील कमतरता आणि मागणीतील बदलत्या प्रोफाइलमुळे किमती लक्षणीयरीत्या वाढू शकतात. चांदी १०० डॉलर प्रति औंस किंवा सुमारे ३ लाख रुपये प्रति किलो इतका दर गाठू शकते. परंतु गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की चांदीतील मजबूत तेजीनंतर अनेकदा तीव्र घसरण होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement

>> कॅरेटनुसार सोन्याच्या किमती

आज, २३ कॅरेट सोन्याचेही ९३३ रुपयांनी वाढून ते प्रति १० ग्रॅम १,३२,१८२ रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,३६,१४७ झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ८५७ रुपयांनी वाढून १,२१,५६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह ती १,२५,२११ रुपये झाली आहे.
advertisement
१८ कॅरेट सोन्याची किंमत ७०२ रुपयांनी वाढून ९९,५३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत १,०२,५२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याची किंमत देखील ५४७ रुपयांनी वाढली आहे. आज ते ७७,६३७ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ती ७९,९६६ रुपये झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price News : एका झटक्यात चांदी ८,८७५ रुपयांनी महागली! दोन लाखांचा टप्पा पार, सोन्याचा प्रति तोळा दर किती?
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement