नोव्हेंबर महिन्यातल्या या दोन तारखा आताच लक्षात ठेवा, पैसे नाही मिळणार किंवा दंड द्यावा लागेल

Last Updated:

HSRP नंबर प्लेटसाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख, चुकल्यास १० हजार दंड. लाडकी बहीण योजनेत E KYCसाठी १८ नोव्हेंबर शेवटची संधी, न केल्यास लाभ मिळणार नाही.

News18
News18
तुमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्यातील दोन महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा, त्या चुकल्या तर तुमचं नुकसान झालंच म्हणून समजा. जर तुम्ही या दोन डेडलाईन गाठल्या नाहीत, तर एकतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल, किंवा तुमच्या हक्काचे पैसे मिळणार नाहीत! या दोन तारखा का लक्षात ठेवायला हव्यात आणि त्यातून तुमचा नफा काय आणि तोटा काय होईल ते जाणून घेऊया.
३० नोव्हेंबर तारीख चुकली तर भरावा लागेल दंड
अनेक राज्यांमध्ये HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. ज्यांनी अजूनही या नंबरप्लेट बसवून घेतल्या नाहीत त्यांनी तातडीनं हे काम पूर्ण करा. नाहीतर 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. जे नियम मोडतील त्यांना १ डिसेंबरपासून दंड लावण्यात येणार आहे. एप्रिल 2019 आधी ज्यांची वाहानं आहे त्या सगळ्यांना नवीन नंबरप्लेट बसवून घेणं बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली नाही.
advertisement
१८ नोव्हेंबर तारीख आताच नोट डाऊन करा
दुसरी तितकीच महत्त्वाची तारीख म्हणजे १८ नोव्हेंबर. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांना अजूनही E KYC केली नाही त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. 2 महिन्यांची ही मुदत संपत आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी E KYC करण्याची मुदत संपणार आहे. ज्यांनी EKY केली नाही त्यांनी आताच करून घ्या. अन्यथा तुमचं नाव या यादीमधून वगळण्यात येणार आहे. ज्या महिलांची नावं या यादीतून वगळली जातील त्यांना दीड हजार रुपये महिना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही.
advertisement
या दोन्ही तारखा जवळ आल्यामुळे आता कोणत्याही प्रकारची दिरंगाई करून चालणार नाही. ३० नोव्हेंबरचा दंड टाळण्यासाठी आणि १८ नोव्हेंबरनंतर पैसे न मिळण्याची वेळ येऊ नये, यासाठी तातडीने आपल्या बँकेच्या शाखेत किंवा संबंधित सरकारी कार्यालयात संपर्क साधा आणि दोन्ही अपडेट्स पूर्ण करुन घ्या नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
नोव्हेंबर महिन्यातल्या या दोन तारखा आताच लक्षात ठेवा, पैसे नाही मिळणार किंवा दंड द्यावा लागेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement