advertisement

Bank Account: सेव्हिंग्स आणि करंट बँक अकाउंटमध्ये काय फरक असतो? कोणतं आहे बेस्ट?

Last Updated:

Savings Account, Current Account: सेव्हिंग अकाउंट आणि करंट बँक अकाउँट यामध्ये तुमच्यासाठी कोणते चांगले आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.

करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट
करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट
मुंबई: एखादी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय सुरू करत असताना अनेकदा बँक अकाउंट उघडण्याबाबत कंफ्यूज असते. खरंतर सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट हे बँकांमध्ये उघडले जाणारे सर्वात सामान्य अकाउंट आहेत. ग्राहकांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे दोन्ही अकाउंट सुरू करण्यात आले आहेत. तथापि, तुम्ही कोणते खाते उघडू इच्छिता हे तुमच्या बँकिंग गरजांवर पूर्णपणे अवलंबून आहे. बचत आणि चालू बँक सेवा भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख बँकांद्वारे प्रदान केल्या जातात.
काय आहे सेव्हिंग अकाउंट?
नावाप्रमाणेच, सेव्हिंग अकाउंट दीर्घ कालावधीसाठी तुमचे पैसे वाचवण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
सेव्हिंग अकाउंटची वैशिष्ट्ये-
या अकाउंटमध्ये डिपॉझिट केल्यावर तुम्हाला निश्चित व्याज मिळते.
सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स करंट अकाउंटच्या तुलनेत कमी आहे.
बँकांनी जमा केलेले व्याज भविष्यात इमरजेंसीसाठी फायदेशीर असते.
करंट अकाउंट्स
करंट बँक अकाउंट अशा ग्राहकांसाठी असते, जे मोठ्या प्रमाणात नियमित पैशांचे ट्रांझेक्शन्स करतात.
advertisement
करंट अकाउंटची मुख्य वैशिष्ट्ये-
-या प्रकारचे अमाउंट फर्म्स, कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, व्यापारी इत्यादी ग्राहकांसाठी योग्य आहे.
-करंट अकाउंटमध्ये बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या fluidity मुळे कोणताही व्याज मिळत नाही.
-करंट अकाउंटमध्ये देवाणघेवाणीच्या संख्येची कोणतीही मर्यादा नसते.
advertisement
सेव्हिंग आणि करंट बँक अकाउंट यातील फरक
उद्दिष्ट- बचत खाते हे बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केलेले आहे, तर करंट अकाउंट नियमित किंवा वारंवार होणारे व्यवहार सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
मासिक ट्रांझेक्शन- सेव्हिंग अकाउंट ऑफर करणार्‍या बँका सहसा एका महिन्यात एक ग्राहक करू शकणार्‍या जास्तीत जास्त ट्रांझेक्शनची मर्यादा निर्धारित करतात. यापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास बँकांकडून दंडाच्या स्वरूपात काही शुल्कही आकारले जाते. तर करंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ट्रांझेक्शनवर लिमिट नाही. कारण करंट अकाउंट वारंवार ट्रांझेक्शन करण्याच्या उद्देशाने काम करते.
advertisement
मिनिमम बॅलेन्स - मिनिमम बॅलेन्स रक्कम ही किमान रक्कम आहे जी नेहमी आपल्या अकाउंटमध्ये असायला ही. जी आपल्या अकाउंटमध्ये नेहमी ठेवली पाहिजे जेणेकरून अकाउंट इनअ‍ॅक्टिव्ह किंवा डोरमेँट होण्यापासून वाचवला जाऊ शकतो. सेव्हिंगअकाउंटसाठी मिनिमम बॅलेन्स रक्कम सामान्यतः कमी असते. मात्र करंट अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटच्या तुलनेत मिनिमम बॅलेन्स जास्त असते.
advertisement
तुम्ही कोणते अकाउंट उघडायला हवे
सॅलरी, नियमित उत्पन्न किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी बचत खाते हा योग्य पर्याय आहे. तर ज्यांना वारंवार पैसे ट्रान्सफर करावे लागतात अशा व्यावसायिक, कंपन्या, फर्म्स, संस्था, सार्वजनिक उपक्रम इत्यादींसाठी करंट अकाउंट बेस्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Bank Account: सेव्हिंग्स आणि करंट बँक अकाउंटमध्ये काय फरक असतो? कोणतं आहे बेस्ट?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement