Success Story : नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आठ वर्षांची नोकरी मागे सोडून तिने स्वतःचा केक शॉप व्यवसाय उभारला असून, अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : तरुणाईत नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या नव्या उद्योजकतेच्या प्रवाहात बोरिवलीतील मनाली तावडे हिनेही स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. आठ वर्षांची नोकरी मागे सोडून तिने स्वतःचा केक शॉप व्यवसाय उभारला असून, अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मनालीनं बारावीनंतर पुढील शिक्षणासोबत व्हीएफएक्स कोर्स केला. या काळात ती आपल्या भावाच्या केक शॉपमध्ये मदतीसाठी जायची. सुरुवातीला तिने हे फक्त हातभार म्हणून केलं होतं. मात्र काम करताना केक बनवण्यातील सूक्ष्म बारकावे, सजावट, ग्राहकांच्या आवडी आणि व्यवसायाच्या पद्धती समजत गेल्याने तिची या क्षेत्रात खरी आवड निर्माण झाली.
advertisement
Farmer success story: पेरूनं नशीब चमकवलं, 4 बिगामधून 400000 लाखांचं उत्पन्न घेणारा हा बागायतदार कोण?
तब्बल आठ वर्षे ती भावाच्या केक शॉपमध्ये काम करत होती. दरम्यान तिने केक बनवण्याची तंत्रं, बेकिंगमधील अचूकता, ग्राहक व्यवहार आणि व्यवसायाचे व्यवस्थापन याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अनुभव वाढत गेला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णयही पक्का झाला.
advertisement
वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी असतानाही तिच्या आईनं पारंपरिक विचार न करता मुलीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मनालीच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिच्या सोबत उभं राहत प्रोत्साहन दिलं. या दोघांच्या साथीनं तिनं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय अमलात आणला.
चार वर्षांपूर्वी तिनं केक स्टोरी नावाने बोरिवली पश्चिम, शिंपोली मेट्रो स्टेशनजवळ स्वतःचं केक शॉप सुरू केलं. वाढदिवस, लग्न, ॲनिव्हर्सरी, कॉर्पोरेट इव्हेंट्स यांसाठी खास डिझाइन केलेले आणि कस्टमाइज्ड केक तयार करणं हे या शॉपचं वैशिष्ट्य आहे. गुणवत्तेमुळे आणि वेळेवर सेवा देण्यामुळे ‘केक स्टोरी’ ला परिसरात चांगली ओळख मिळाली आहे. सध्या या व्यवसायातून मनाली तावडे यांचं वार्षिक उत्पन्न सुमारे 24 लाख रुपयांच्या घरात पोहोचलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2025 4:53 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!









