Success Story : शिक्षण बारावी पास, तरुण करतोय सोडा विक्री व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोडा विक्री करण्याचा व्यवसाय पुढे नेण्याचे काम करत असून ही त्यांची पाचवी पिढी आहे. तर या सोडा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
सोलापूर : उच्च शिक्षण शिकूनही नोकरी मिळत नसल्याने काही तरुण स्वतःचा व्यवसाय करत आहेत, तर काहीजण आपला पारंपरिक व्यवसाय पुढे नेण्याचं काम करत आहेत. सोलापूर शहरातील साखर पेठेत राहणारे मास बच्चेभाई हे आपल्या वडिलोपार्जित सोडा विक्री करण्याचा व्यवसाय पुढे नेण्याचे काम करत असून ही त्यांची पाचवी पिढी आहे. तर या सोडा विक्रीच्या व्यवसायातून महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
मास बच्चेभाई, वय 23, राहणार साखर पेठ, यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण न घेता त्यांनी वडिलोपार्जित सोडा विक्रीचा व्यवसाय पुढे नेण्याचे काम सुरू केले. 1962 साली बाबा सोडा या नावाने हा व्यवसाय सुरू करण्यात आला होता. आज जवळपास सोडा विक्रीत बच्चेभाई यांची ही पाचवी पिढी आहे.
advertisement
Sinhagad Fort : वय 84 वर्षे, पुण्यातील करवंदे काकांची कमाल, 1700 हुन अधिक वेळा सर केला सिंहगड, Video
सुरुवातीला या ठिकाणी फक्त लिंबू सोडा आणि साधा सोडा मिळत होता. आज जवळपास 12 ते 15 सोड्याचे फ्लेवर मास बच्चेभाई यांच्याकडे पिण्यासाठी उपलब्ध आहेत. पुदिना सोडा, जिरा सोडा, लेमन सोडा, अद्रक सोडा, जलजिरा सोडा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी दुधापासून मिल्कशेक, रोज मिल्क, बदाम मिल्कशेक, दुधापासून बनवलेली मावा रबडी देखील या ठिकाणी मिळत आहे.
advertisement
मास बच्चेभाई यांच्याकडे 200 मिली सोडाची किंमत 20 रुपये इतकी आहे. दुधापासून बनवलेल्या मिल्कशेकची किंमत 30 रुपयांपासून सुरू आहे. तसेच सोडा आणि दुधापासून बनवलेला मिल्कशेक पार्सल देखील या ठिकाणी दिलं जातं. दररोज 5 ते 6 कॅरेट सोडा आणि दुधापासून बनवलेले मिल्कशेक विक्री होतात. तर या व्यवसायातून 23 वर्षांचे तरुण मास बच्चेभाई महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 24, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शिक्षण बारावी पास, तरुण करतोय सोडा विक्री व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल

