तुमच्याकडे फक्त 26 दिवस शिल्लक! परिवहन विभागाने दिली महत्त्वाची सूचना

Last Updated:

ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे आणि आजपासून तुमच्याकडे फक्त २६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
तुम्ही हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवून घेतली का? नाही ना की अजूनही टाळाटाळ केलीय, तसं असेल तर आताच लक्ष द्या, त्याचं कारण असं की तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने हायसिक्युरिटी नंबर प्लेट कंपल्सरी केली आहे. त्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर देण्यात आली आहे. तुमच्या हातात केवळ 26 दिवस शिल्लक राहिले आहेत. जर तुम्ही नंबरप्लेट लावली नाही तर 10 हजार रुपये तयार ठेवा, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
यापूर्वी सरकारने तीनवेळा मुदतवाढ दिली होती. मात्र आता कोणतीही मुदतवाढ देणार नाही असे संकेत दिले आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनही हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवून घेतल्या नाहीत त्यांनी तातडीनं ते काम करून घ्या, नाहीतर दंड भरण्याची तयारी ठेवा. वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणं अनिवार्य केलं आहे. तुमच्या हातात आता कमी वेळ उरला आहे. परिवहन विभागाने वेळोवेळी मुदतवाढ देऊनही पालघर जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक वाहनधारकांनी या महत्त्वपूर्ण नियमाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ही नंबर प्लेट लावण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ आहे आणि आजपासून तुमच्याकडे फक्त २६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
advertisement
ही नवी नंबर प्लेट तुमच्या वाहनांसाठी केवळ एक ओळख नाही, तर सुरक्षा कवच म्हणून काम करते. अपघात झाल्यास वाहन मालकाची माहिती तत्काळ आणि अचूक मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो, तसेच वाहनांची चोरी आणि त्यांचा गैरवापर करणे चोरांसाठी खूप कठीण होते. एप्रिल २०१९ नंतरच्या नवीन वाहनांना शोरूममधूनच ही प्लेट मिळते. पण त्यापूर्वीच्या वाहनांना ती स्वतः लावून घेणे बंधनकारक आहे. पालघर जिल्ह्यात २०१९ पूर्वीची एकूण ४ लाख ७८ हजार ९३१ वाहने आहेत. यापैकी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत केवळ १ लाख ६४ हजार ५८२ लोकांनीच ही प्लेट लावली आहे.
advertisement
तीन वेळा मुदतवाढ, तरीही निराशा!
तब्बल ३ लाख १४ हजार ३४९ वाहनधारकांनी या नियमाला गांभीर्याने घेतलेले नाही. परिवहन विभागाने सुरुवातीला ३० एप्रिल ही डेडलाइन दिली, पण प्रतिसाद न मिळाल्याने ती ३० जून, मग १५ ऑगस्टपर्यंत वाढवली गेली आणि आता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ढकलली आहे! मार्च २०२५ पर्यंत केवळ १३ हजार लोकांनी आणि मे पर्यंत फक्त ७० हजार लोकांनी हे काम पूर्ण केले होते, यावरून पालघरमधील लोकांमध्ये किती उदासीनता आहे, हे स्पष्ट दिसते.
advertisement
आता घड्याळाचे काटे वेगाने धावत आहेत! ३० नोव्हेंबर २०२५ नंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला दंड किंवा भविष्यात कोणतीही गैरसोय टाळायची असेल, तर तातडीने नोंदणी करा. तुमच्या सोयीसाठी परिवहन विभागाने शहरांमध्ये अधिकृत केंद्रे उघडली आहेत. इतकंच नव्हे, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळवू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
तुमच्याकडे फक्त 26 दिवस शिल्लक! परिवहन विभागाने दिली महत्त्वाची सूचना
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement