advertisement

वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवणं करा बंद! 'या' फॅमिली अकाउंटमध्ये मिळेल जास्त फायदा 

Last Updated:

आजच्या काळात प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे. अशावेळी काही लोक हे अनेक बँक अकाउंट ओपन करतात. आपले पैसे वगेवेगळ्या बँक अकाउंटमध्ये टाकून सुरक्षित राहतील त्यांना वाटतं. पण हे योग्य आहे की, फॅमिली जॉइंट अकाउंट बेस्ट, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

मनी न्यूज
मनी न्यूज
नवी दिल्ली : प्रत्येकाचं बँक अकाउंट हे असतंच. पण काही लोक हे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट ओपन करत असतात. यामध्ये सॅलरी, सेव्हिंग्स आणि एमर्जेंसी फंड हे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवतात. अनेक लोकांजवळ तर दोनपासून ते पाच अकाउंटही असतात. या लोकांना वाटतं की, असं केल्याने त्यांचा पैसा जास्त सुरक्षित राहील. पण सत्य असं आहे की, जास्त अकाउंट ठेवणं हे अनेकदा फायनेंस मॅनेजमेंट सोपी बनवण्याऐवजी, कठीण बनवते.
आता फायनेंस एक्सपर्ट्स मानतात की, वेगवेगळे अकाउंट ठेवण्याऐवजी एक किंवा दोन फॅमिली जॉइंट अकाउंट ठेवणं जास्त हुशारीचं पाऊल आहे. यामुळे पैशांवर लक्ष ठेवणं सोपं होतं. तसंच कुटुंबाच्या सदस्यांमध्येही पारदर्शकता असते.
फॅमिली जॉइंट अकाउंट म्हणजे काय?
फॅमिली जॉइंट अकाउंट असं बँक अकाउंट असतं, ज्यात कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य सामिल असतात. यात पती पत्नी, आई-वडील किंवा मुलांचाही समावेश असू शकतो. अशा प्रकारे अकाउंटमध्ये सर्व सदस्यांना पैसे जमा करणे आणि काढण्याची सुविधा मिळते. जी अकाउंटच्या ऑप्शनवर अवलंबून असते.
advertisement
फॅमिली अकाउंटचे मोठे फायदे 
फॅमिली जॉइंट अकाउंटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात अनेक बँक चांगले व्याजदर देतात. विशेषतः बॅलेन्स जास्त असतं तेव्हा. यामुळे तुमची सेव्हिंग वेगाने वाढू शकते. यासोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांना माहिती असतं की, पैसा कुठे आणि कसा खर्च होतोय. यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो आणि चांगली प्लॅनिंग करता येऊ शकते.
advertisement
आपात्कालिन परिस्थितीमध्येही हे अकाउंट आणखी कामी येतं. एखादा सदस्य उपलब्ध नसेल, तर दुसरा सदस्य सहज पैसे काढू शकतो आणि काम थांबत नाही. यासोबतच वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे लावल्याने एसएमएस फीस, एटीएम चार्ज आणि मिनिमम बॅलेन्स पेनल्टीपासूनही बचाव करता येतो. यासोबतच वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये 2.5 ते 3.5 टक्के व्याज मिळतं. तर फॅमिली अकाउंटमध्ये अनेक बँका 4 ते 7 टक्के व्याजदर देतात.
advertisement
कोणत्या बँकांमध्ये मिळतात चांगले फॅमिली अकाउंट 
भारतात अनेक बँक फॅमिली किंवा जॉइंट अकाउंटची सुविधा देतात. यामध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया आणि फेडरल बँक यांचा समावेश आहे. या बँकांमध्ये काही स्किम्स अशा आहेत, ज्यात जास्त बॅलेन्सवर चांगलं व्याज आणि अतिरिक्त सविधाही मिळतात.
advertisement
काय रणनीती वापरावी
तुमचं कुटुंब लहान असेल, तर एक मुख्य फॅमिली अकाउंट आणि एक वेगळं एमर्जेंसी किंवा इनव्हेस्टमेंट अकाउंट ठेवणं पुरेसं असतं. यामुळे तुमचं फायनेंसही व्यवस्थित राहतं आणिगरज पडल्यावर लगेच पैसा उपलब्ध राहतो. खुप जास्त अकाउंट ठेवल्याने ट्रॅकिंग करणं कठीण होतं. यासोबतच अनेकदा अकाउंट फ्रिज किंवा केवायसी सारख्या समस्या समोर येऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवणं करा बंद! 'या' फॅमिली अकाउंटमध्ये मिळेल जास्त फायदा 
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement