advertisement

पुणेकर पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, शहरातील 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, पाहा कुठं?

Last Updated:

Pune News: पुणे महापालिकेने सात वर्षांपूर्वीच या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, विविध कारणांमुळे तिची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

पुणेकर पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, ‘पे अँड पार्क’ची तयारी, 5 ठिकाणे कोणती?
पुणेकर पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, ‘पे अँड पार्क’ची तयारी, 5 ठिकाणे कोणती?
पुणे: पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यांवर अनियंत्रितपणे होणाऱ्या पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात ‘पे अँड पार्क’ योजना पुन्हा एकदा राबवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांतील पाच प्रमुख रस्त्यांवर सशुल्क पार्किंग सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी मागवलेल्या फेरनिविदांना प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले की, पाचपैकी चार रस्त्यांसाठी प्रत्येकी दोन अशा एकूण आठ निविदा प्राप्त झाल्या आहेत. यामुळे दीर्घकाळ रखडलेला ‘पे अँड पार्क’ प्रकल्प आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांना रस्त्यावर वाहन उभे करण्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.
advertisement
‘पे अँड पार्क’ सुविधा कुठे?
या योजनेअंतर्गत लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रोड), बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर येथील मुख्य रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व रस्ते शहरातील सर्वाधिक वर्दळीचे मानले जातात. सध्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अधिकृत पार्किंग शुल्क आकारले जात नाही, त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत पार्किंगची समस्या वाढली आहे.
advertisement
महापालिकेने सात वर्षांपूर्वीच या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, विविध कारणांमुळे तिची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. 2019 मध्येही हा प्रस्ताव पुढे आला होता, परंतु सर्वच पक्षांच्या विरोधामुळे तो मागे घेण्यात आला. आता पुन्हा एकदा प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून हा विषय चर्चेत आणला आहे.
किती असेल शुल्क?
नव्या प्रस्तावानुसार दुचाकी वाहनांसाठी प्रति तास सुमारे 10 रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी प्रति तास 20 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दररोज सुमारे 14 तासांसाठी हे शुल्क लागू राहील. यामुळे रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
advertisement
दरम्यान, शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम करणारा हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला असून, लवकरच पुणेकरांना ‘पे अँड पार्क’चा अनुभव घ्यावा लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, शहरातील 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ सुविधा, पाहा कुठं?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement